श्लोका मेहताची बहीण आहे फॅशनिस्टा, दिसायला कार्बन कॉपी तर स्टाईलमध्ये देते ईशा अंबानीला मात

Sholka Mehta’s Elder Sister: भारतातील सर्वात जास्त प्रसिद्ध असणारे कुटुंब म्हणजे अंबानी. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची स्टाईल, राहणीमान सर्वांनाच माहीत आहे. पण मोठी सून श्लोका मेहता हिची मोठी बहीण दीया मेहता आहे श्लोकाची कार्बन कॉपी. दीया मेहता जटिया ही एक इन्फ्लुएन्सर असून खूपच स्टायलिश आहे. याशिवाय दीयाला दोन मुलं असून ती अजिबातच २ मुलांची आई वाटत नाही. दीया अत्यंत सुंदर असून वेगवेगळे कलेक्शन नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दाखवत असते. एकदा दीयाच्या फॅशन सेन्सवर टाकूया नजर. (फोटो सौजन्य – @dmjatiaInstagram)

​स्टायलिश फ्रील वनपिस​

​स्टायलिश फ्रील वनपिस​

दीयाने घातलेला हा गडद लव्हेंडर रंगाचा वनपिस अत्यंत आकर्षक असून याला खाली फ्रील आहे. एखाद्या बाहुलीसारखा हा लुक असला तरीही तितकाच स्टायलिश दीयाने कॅरी केला आहे. यासह क्लच घेऊन लुक पूर्ण केला आहे. ब्रँडेड क्लच आणि पर्सने दीया नेहमीच कलेक्शन करत असते.

हेही वाचा :  तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी, फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा

​बॅकलेस ड्रेस बीच लुक ​

​बॅकलेस ड्रेस बीच लुक ​

दीया इन्फ्लुएन्सर असल्यामुळे नेहमीच वेगवेगळ्या स्टाईल्स कॅरी करते. तसंच तिने उत्तम फिटनेस ठेवला असून या बीच लुकमध्ये बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. गॉगल लावून हा लुक अधिक स्टायलिश केला आहे. मोकळे केस आणि मिनिमल मेकअप यामुळे हा लुक अधिक आकर्षक दिसून येतो.

(वाचा – महाराणी सईबाईच्या लुकमध्ये सायलीचा भारदस्त लुक, साडीपासून दागिन्यांपर्यंत दिसतेय पारंपरिकता)

​लाल ड्रेसमधील परी​

​लाल ड्रेसमधील परी​

डॉट्स ड्रेसचा ट्रेंड कधीच जुना होत नाही. दीयाने यामध्ये लालभडक डॉट्स ड्रेस घातला असून पायापासून हा ड्रेस पारदर्शी आहे. वेगळ्याच स्टाईलचा हा ड्रेस असला तरीही दीयाने तो इतक्या उत्तमरित्या कॅरी केला आहे की, तो कोणालाही छानच दिसेल असे वाटू शकते. यासह दीयाने लाल लिपस्टिक आणि ग्लॉसी मेकअप केला आहे. जो ड्रेसला परफेक्ट मॅच होतोय.

(वाचा – सलमान खानला डेट करत असल्याची चर्चा असतानाच पूजा हेगडेचा नवरीचा लुक, भारतीय सौंदर्य वाहतेय ओसंडून)

​वन साईड शोल्डर ड्रेस​

​वन साईड शोल्डर ड्रेस​

कोणत्याही पार्टीसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे. लाईन्सचा हा वन शोल्डर ड्रेस खूपच आकर्षक दिसत असून दीयाने यासह आपले केस मोकळे सोडले आहेत आणि मिनिमल मेकअप केला आहे. दीयाला दोन मुलं आहेत असं तिच्या फिटनेस आणि त्वचेवरूनही कळून येत नाही.

हेही वाचा :  Leena Nagwanshi : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने संपवल आयुष्य, 'हे' आहे कारण

(वाचा – जान्हवी कपूरचा ब्राऊन साडीतला ‘सत्यम शिवम सुंदरम’ लुक, ब्लाऊजलेस साडीत केले फोटोशूट)

​डार्क पर्पल ड्रेस​

​डार्क पर्पल ड्रेस​

सध्या पर्पल रंगाचा ट्रेंड आहे. त्यातही पार्टी असो अथवा कोणताही थीम लुक असो हा रंग अधिक वापरला जातो. दीयानेही पर्पल ड्रेसची स्टाईल करत त्यावर एक बो लावला आहे. यामुळे या ड्रेसची शोभा अधिक वाढली आहे. तर या लुकमध्ये दीयाने केलेली हेअरस्टाईल या ड्रेसला मॅच करत आहे.

​आईसह दीयाचा घरगुती लुक​

​आईसह दीयाचा घरगुती लुक​

दीया अत्यंत स्टायलिश आहे हे तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्यानंतर कळून येईच. पण आईसहदेखील दीयाने कम्फर्टेबल लुक कॅरी केला असला तरीही तिचा घरगुती लुक एक स्टाईल म्हणूनच पाहिला जातोय. यातून आई-मुलीचा बाँडही दिसून येत आहे.

दीयाने हार्डकॅसल रेस्टॉरंटचा मालक आयुष जटिया याच्याशी लग्न केले आहे. मात्र लग्नानंतरही तिने आपले पॅशन आणि फॅशन दोन्ही जपले आहे. तुम्हाला कसा वाटला दीयाचा लुक नक्की सांगा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …