मेथी दाणे आणि आवळ्याच्या वापराने होतील नैसर्गिकरित्या घनदाट केस, लांब केसांसाठी असा करा वापर

​मेथी आणि आवळ्याचा कसा करावा वापर​

How To Use Fenugreek Seeds And Amla Powder: मेथी दाणे आणि आवळा या दोन्ही गोष्टींचा केसांना चांगला उपयोग होतो. तसंच याचे केसांवर दुष्परिणाम होत नाहीत. पण याचा कसा वापर करावा जाणून घ्या.

  • २-३ चमचे मेथी दाणे रात्री पाण्यात भिजवा
  • सकाळी उठल्यावर हे वाटून घ्या त्यामध्ये साधारण दीड चमचा आवळा पावडर मिक्स करा
  • तुम्हाला हवं असल्यास २ चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करा आणि व्यवस्थित पेस्ट करा
  • त्यानंतर स्काल्पला लावा आणि मसाज करा
  • ही पेस्ट साधारण २ तास केसांवर तशीच राहू द्या
  • नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केसांवर करू शकता

​केसांना मिळते पोषण​

Hair Nutrition: मेथी दाणे आणि आवळ्यामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते. तसंच केसांचे तुटणे आणि केसगळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. याच्या नियमित वापरामुळे केसांमध्ये मुलायमपणाही टिकून राहतो. मेथी आणि आवळ्याच्या एकत्रित वापरामुळे केसांमधील खाज, कोंडा होणे, केस कोरडे होणे या समस्या निघून जाण्यास मदत मिळते. तसंच नैसर्गिक स्वरूपात केस काळे राहतात आणि जलद गतीने केस वाढण्यासही मदत मिळते. घनदाट केसांसाठी याचा वापर करावा.

हेही वाचा :  लग्न नाही प्रेमावर विश्वास ठेवला अन् श्रद्धाच्या शरीराचे झाले 35 तुकडे, प्रेमात बुडालेल्यांनो जागे व्हा कारण..

मेथी दाणे अथवा आवळा यापैकी कोणत्याही पदार्थाची अलर्जी असेल तर त्याचा वापर करू नका. है नैसर्गिक पदार्थ आहेत मात्र तरीही तुम्ही वापरण्याआधी तुमच्या डर्मेटॉलिजिस्टचा सल्ला नक्की घेऊ शकता.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दहावी नापास झाल्यावर काय करावे?

Career For 10th Fail: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी …

ब्रह्मांडामध्ये 13000000 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? शास्त्रज्ञांनी Photo दाखवत सांगितली भारावणारी गोष्ट

James Webb Telescope Image: जगाच्या उत्पत्तीच्या वेळी अवकाशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या होत्या? या विश्वातील …