योनिमार्गातील कोरडेपणा कसा दूर कराल? कशी घेता येईल काळजी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

सर्व वयोगटातील महिलांमध्ये योनिमार्गात कोरडेपणा दिसून येतो. रजोनिवृत्तीदरम्यान एस्ट्रोजेन पातळीमुळे योनीमार्गावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. तणाव, चिंता, रक्त प्रवाह कमी होणे आणि निर्जलीकरण हे काही घटक आहेत. ज्यामुळे योनीमार्गाचे वंगण कमी होऊ शकते. तसेच, योनिमार्गातील कोरडेपणा टाळण्यासाठी आणि वंगण वाढविण्यासाठी पोषक आहाराची गरज आहे. यासाठी डॉ. प्रीतिका शेट्टी, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खराडी यांच्याकडून आम्ही महत्त्वाची माहिती घेतली आहे. योनिबाबत बोलणे आजही टाळले जाते. अनेक महिलांना होणारा त्रास व्यक्त करता येत नाही. पण सतत कोरडेपणा जाणवत असेल तर त्यामुळे पुढे गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच यावर माहिती करून घ्या आणि आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा.

योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे कोणत्या समस्या उद्भवतात:

योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे अनेक समस्या सुरू होतात. पण बरेचदा लाजेमुळे अथवा कसे सांगावे हे कळत नसल्यामुळे अशा समस्या सांगितल्या जात नाहीत. पण नक्की कोणत्या समस्या आहेत, ते जाणून घ्या.

  • जळजळ होणे
  • लैंगिक संबंधातील रस कमी होणे
  • वेदनादायक संभोग
  • योनीमार्गाला खाज सुटणे
  • मूत्रमार्गातील संक्रमण (युटीआय)
हेही वाचा :  खळबळ! गणेश मंडळाची रेकी केल्याचा संशयातून नाशिकमध्ये एक संशयित ताब्यात

या अत्यंत गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तसंच वेळीच यावर उपाय करून घेणे गरजेचे आहे. मुळात या समस्या गंभीर आहेत हे तुम्ही तुमच्या डोक्यात पक्के बसवा.

योनीमार्गाच्या कोरडेपणाची कारणे

बरेचदा महिलांना प्रश्न पडतो की योनीमार्ग कोरडा नक्की पडतो. सतत खाज येत असेल तर समजून जावे की योनीमार्ग कोरडा पडला आहे. पण याची नक्की कारणे शोधून घेण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्याची कारणे आधी जाणून घ्यायला हवीत.

  • कमी एस्ट्रोजेन पातळी
  • अधिक धुम्रपान
  • रासायनिक उत्पादनांचा वापर
  • अतिप्रमाणातील शारीरिक क्रियाकलाप
  • शस्त्रक्रिया होणे
  • विशिष्ट औषधांचा वापर
  • तणाव आणि डचिंग

या सर्व कारणामुळे योनिमार्गात अधिक कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे.

(वाचा – New Year 2023: नव्या वर्षात आहारात करा या ५ विटामिन्सचा समावेश)

योनीमार्गाच्या कोरडेपणाचे व्यवस्थापन कसे कराल?

वेळीच उपचार न केल्यास तसेच योनीमार्गाच्या कोरडेपणामुळे योनीच्या ऊतींमध्ये फोड किंवा तेथील त्वचा फाटण्याचा धोका वाढतो. योनिमार्गाच्या कोरडेपणावर अशा प्रकारे करा उपचार :

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने जे ओव्हर-द-काउंटर वंगण किंवा मॉइश्चरायझर्सचा वापर करण्यास सांगितला जाईल त्यामुळे योनीच्या भागातील कोरडेपणा आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी मदत करेल
  • तुम्हाला गोळी, क्रिम किंवा रिंगच्या स्वरूपातील एस्ट्रोजेन थेरपीचीदेखील शिफारस केली जाईल, जी एस्ट्रोजेन सोडण्यास मदत करते
हेही वाचा :  Video : बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं

(वाचा – वजन कमी करण्यासाठी चुकीच्या डाएटचे फॅड टाळा, अन्यथा होईल विपरीत परिणाम)

संतुलित आहाराचे सेवन करा

व्हिटॅमिन डी: सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून ओळखला जातो. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि विविध अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की ते योनीतील वंगण वाढविण्यात देखील मदत करू शकते. एवढेच नाही तर रजोनिवृत्ती दरम्यान योनिमार्गाच्या कोरडेपणाचे व्यवस्थापन आणि योनीचे आरोग्य सुधारण्यास ड जीवनसत्वयुक्त सप्लीमेंट मदत करू शकते.

व्हिटॅमिन ई: हे एक अँटिऑक्सिडंट आहे. संशोधनानुसार, वंगण आणि योनिमार्गाच्या कोरडेपणाचा सामना करण्यासाठी हे उपयुक्त ठरत आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.

हायलुरोनक अॅसिड: ग्लुकोसामाइन सल्फेट, अल्फा-लिपोइक ऍसिड आणि ए,सी आणि ई जीवनसत्त्वे यांसारख्या इतर घटकांसह योनिमार्गाचा कोरडेपणा सुधारण्यास मदत होते. अगदी हायलुरोनक ऍसिडयुक्त जेल देखील व्हिटॅमिन ई सोबत योनिमार्गाचे स्नेहन वाढवत असल्याचे दिसून आले आहे.

फिश ऑइल: फिश ऑइलमधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड रजोनिवृत्ती दरम्यान योनीतील वंगण वाढवण्यास आणि योनीमार्गाचा कोरडेपणा टाळण्यास मदत करते.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …