Viral Photo : व्हायरल झालेला 86 वर्ष जुना फोटो सगळेच होत आहेत हैराण परेशान; असं आहे तरी काय यात?

Viral Photo On Internet : इंटरनेटवर अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Photo) होत असतात. असाच 86 वर्ष जुना फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत दिसणारी एक वस्तू पाहून सगळेच हैराण परेशान होत आहेत.  टाइम ट्रॅव्हलने (time travel ) या फोटोबाबत एक खळबळजनक दावा (Sensational claim) केला आहे. यामुळे या फोटोची जास्तच चर्चा होत आहे.

टाईम ट्रॅव्हलबद्दल अनेक गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात. या फोटोबाबतही टाईम ट्रॅव्हलने केलेल्या दाव्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. हा फोटो म्हणजे 1930 दशकातील एक पेंटिंग आहे. या फोटोमध्ये जे दिसतयं ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. टाइम ट्रॅव्हल म्हणजे भविष्यात किंवा भूतकाळात डोकावणे. 

व्हायरल झालेले हे पेंटिंग 1937 मध्ये इटालियन कलाकार उम्बर्टो रोमानो यांनी बनवले होते. हा फोटो 1620 च्या दशकात शहरात स्थायिकांचे आगमन दर्शवते. या फोटोतील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे या फोटोतील माणसांच्या गर्दीतील एका व्यक्तीच्या हातात मोबाईल सदृश्य वस्तू दिसत आहे. 

एका माध्यमाने याबाबतचे वृत्त दिले आहे. या फोटोत माणसांची गर्दी पहायला मिळत आहेत. यात अनेकजण दिसत आहेत. काही व्यक्तींचे हात बांधलेले दिसत आहेत. यावरुन त्यांना शिक्षा झालेली असावे असे समजते. तर काही लोकांच्या पेहरावावरुन ते सैनिक असल्याचे दिसते. त्यातच या पेंटीगमधील एका व्यक्तीच्या हातात फोनसारखी वस्तू दिसत आहे. सेल्फी काढल्यासारखा तो व्यक्ती या वस्तुकडे लक्षपूर्वक पाहत आहे. 

हेही वाचा :  मलायका आणि अरबाजचे पॅरेंटिंग का आहे प्रेरणादायी, घटस्फोटानंतर मुलांना कसे सांभाळावे

या वस्तूबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. ही वस्तू माबोईल फोन असल्याचा दावा टाईम ट्रॅव्हलला फॉलो करणाऱ्या लोकांनी केला आहे. तर, हा आरसा असावा अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. 

1928 च्या चित्रपटातही मोबाईल सारखी वस्तू दिसली होती

हे पेटिंग 1937 सालामधील आहे. पण याआधीही मोबाईल फोन त्या पित्रपटामध्ये पहायला मिळाला आहे. 1928 मध्ये बनलेल्या चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटात एक महिला मोबाईलसोबत दिसली होती. चार्ली चॅप्लिनच्या या ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाचे नाव सर्कस होते, जो एक विनोदी मूक चित्रपट होता. या  चित्रपटातही मोबाईल सारखी वस्तू दिसली होती.  टाईम ट्रॅव्हलिंग आणि एलियन्स या सर्व काल्पनिक गोष्टी असून हे पेंटिंग देखील काल्पनिक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …