मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा विकेंडला विशेष पॉवर ब्लॉक, ‘या’ लोकल रद्द होणार

Central Railway Mega Block: मुंबई लोकलही मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखली जाते. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेकडून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर, काही लोकल उशीराने धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून तसं जाहीर करण्यात आलं आहे. (Mumbai Local Update)

उल्हासनगर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम स्थलांतरित करण्यासाठी आणि हायड्रा मशीनद्वारे उभारणीसाठी कल्याण-अंबरनाथ विभागात किमी 57/10-12 येथे डाउन आणि अप दक्षिण-पूर्व मार्गांवर दि. २६ आणि २७ ऑगस्ट २०२३ रोजी ((शनिवार/रविवार मध्यरात्री) रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कल्याण-अंबरनाथ विभागात किमी 57/10-12 येथे रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्ये उल्हासनगर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम स्थलांतरित करण्यासाठी आणि हायड्रा मशीनद्वारे उभारणीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळं या दिवसांत गाड्यांच्या वेळात काही बदल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा :  जो बायडन म्हणाले पुतीन 'वॉर क्रिमिनल'; रशियाचा संताप, आठवण करुन देत म्हणाले "जगभरात बॉम्ब टाकून..." | Ukraine Crisis Russia Slams Biden War Criminal Comment On Putin sgy 87

ब्लॉकचा विभाग

कल्याण ते अंबरनाथ डाउन दक्षिण-पूर्व लाईन आणि अंबरनाथ ते कल्याण अप दक्षिण-पूर्व मार्ग (कल्याण आणि अंबरनाथ दोन्ही स्थानके वगळून)

ब्लॉकची तारीख, वेळ आणि कालावधी

२६ आणि २७ ऑगस्ट २०२३ (शनिवार/रविवार मध्यरात्री) रात्री ०१.१० वाजल्यापासून ते ०२.१० वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे 1 तास ब्लॉक असणार आहे. 

 या ट्रेनला बसणार फटका

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 11.51 वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची लोकल आणि
अंबरनाथ येथून 10.01 व 10.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या लोकल रद्द होणार आहेत.

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12.04 वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची लोकल कुर्ला येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12.25 वाजता सुटणारी कर्जत साठीची लोकल कल्याण स्थानकावर 01.51 ते 02.10 या वेळेत नियमित (regulated) केली जाईल.

– ब्लॉक कालावधीत कल्याण ते अंबरनाथ दरम्यान मालवाहतूक गाड्यांची वाहतूक (ट्रॅफिक) बंद राहील.

दरम्यान, कसारा स्थानकात आता सहा नव्या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. आज 23 ऑगस्टपासून एलटीटी शालिमार एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटणा एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. 

हेही वाचा :  खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …