कोरफड आणि नारळाचे तेल रात्रभर केसांना लावले तर मिळतील अफलातून फायदे, केसांची वाढ थांबणार नाही

कोरफड आणि नारळाचे तेल दोन्हीमध्ये केसांना आवश्यक असणारी पोषक तत्व आढळतात. केसांना लागणारे पोषण आणि औषधीय गुण या दोन्हीमुळे केस अधिक मजूबत होण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते. अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने कोरफड आणि नारळाच्या तेलाचे केसांना जबरदस्त फायदे मिळतात. पण नक्की हे तेल कधी केसांना लावावे आणि या तेलाचा कसा उपयोग करावा याबाबत ब्युटिशियन स्मिता कांबळे यांच्याकडून आम्ही ही माहिती घेतली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

​केसांची वाढ होण्यास मिळते मदत​

​केसांची वाढ होण्यास मिळते मदत​

Hair Growth Benefits: धूळ, प्रदूषण, माती या सगळ्याच्या त्रासामुळे अनेकांना केसांची वाढ न होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र कोरफड आणि नारळाच्या तेलाचा वापर केल्यास, केस वाढण्यास मदत मिळते. नारळाच्या तेलातील गुणधर्म केसांना योग्य पोषण देऊन वाढीला मदत करतात.

केस होतील चमकदार

केस होतील चमकदार

Hair Shine: कोरफडमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे केसांमधील स्काल्पची समस्या काढून टाकण्यास मदत करतात. तसंच कोरफड आणि नारळाच्या तेलाच्या गुणधर्मामुळे केस अधिक चांगले मॉईस्चराईज राखण्यासही मदत मिळते. यामुळेच केसांची नैसर्गिक चमक राखली जाते.

हेही वाचा :  Covid 4th wave: आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'या' महिन्यात येणार करोनाची चौथी लाट, यावेळी ही 14 लक्षणं घालणार धुमाकूळ..!

(वाचा – केसांना जास्त कंडिशनर लावल्याने होऊ शकतं नुकसान? काय म्हणतात तज्ज्ञ)

​कोंड्यापासून मुक्तता​

​कोंड्यापासून मुक्तता​

Removes Dandruff From Hair: केसांमधील स्काल्प खराब झाल्याने अथवा धूळ, प्रदूषणामुळे कोंड्याची समस्या अनेकांना जाणवते. मात्र तुम्ही वेळोवेळी कोरफड आणि नारळाच्या तेलाने केसांना रात्रभर लावून पोषण दिल्यास, कोंड्याच्या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. केसांना निरोगी करण्याचे काम कोरफड करते.

(वाचा – सकाळच्या काळ्या चहाने केस धुतले तर मिळेल अशी चमक की व्हाल आश्चर्यचकीत)

​केस लवकर पांढरे होत नाहीत​

​केस लवकर पांढरे होत नाहीत​

Aloe Vera And Coconut Oil For Hair Overnight Benefits: अँटीऑक्सिडंट गुण कोरफडमध्ये असल्याने आणि नारळाचे तेल केसांना मुळापासून पोषण देत असल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. तुम्हाला जर केसांना योग्य पोषण द्यायचे असेल तर रात्रभर तुम्ही या तेलाचा केसांवर उपयोग करा आणि पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवा.

(वाचा – सतत चेहरा धुतल्याने या समस्यांना जावे लागेल सामोरे, चेहरा होऊ शकतो खराब)

​केसगळती थांबविण्यास उपयोगी​

​केसगळती थांबविण्यास उपयोगी​

अनेकांना केसगळती होण्याची समस्या हल्ली अधिक प्रमाणात जाणवते. कोरफड आणि नारळाच्या तेलाचा एकत्र उपयोग करण्यात आल्यास केसगळती थांबविण्यास मदत मिळते. केसांना मुळापासून पोषण मिळते आणि केसगळतीचे प्रमाण कमी होते.

हेही वाचा :  Maharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती?

​केसात कोरफड आणि नारळाचे तेल कसे लावावे​

​केसात कोरफड आणि नारळाचे तेल कसे लावावे​

Ways To Apply Coconut Oil And Aloe Vera For Hair Growth: केसांमध्ये या तेलाचा कसा वापर करावा ज्यामुळे फायदा मिळू शकतो हे जाणून घ्या.

  • रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सर्वात आधी नारळाचे तेल घ्या आणि कोमट करा कोमट झाल्यावर त्यात १-२ चमचे कोरफड जेल मिक्स करा
  • हे मिश्रण तुम्ही केसांच्या स्काल्पपासून लावा आणि काही मिनिट्स मसाज करा
  • रात्रभर तुम्ही हे तेल लावा आणि झोपा
  • सकाळी उठल्यानंतर केस माईल्ड शँपूनंतर धुवा
  • आठवड्यातून एक दिवस याचा वापर केल्यास तुम्हाला परिणाम दिसून येईल

टीप – ही माहिती आम्ही तज्ज्ञांकडून घेतली आहे. मात्र तुम्हाला कोणतीही अलर्जी असल्यास याचा वापर करू नये अथवा आपल्या ब्युटिशियनकडून समजून त्याचा वापर करावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …