Maharashtra SSC Exam 2022: दहावी परीक्षेचे हॉलतिकीट १८ फेब्रुवारीपासून होणार उपलब्ध

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (Mharashtra Board)इयत्ता दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट (SSC Exam 2022 Hall Ticket) विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध होणार आहे. हे हॉलतिकीट शाळांना शुक्रवारी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in येथून स्कूल लॉगइन मधून डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास शाळांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे.

शाळांसाठी मंडळाच्या अशा आहेत सूचना –

– ऑनलाइन प्रवेशपत्रे (Hall Ticket)डाऊनलोड करून शाळांनी त्याचे प्रिंट काढून ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
– प्रवेशपत्रांचे प्रिंट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये.
– हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
– प्रवेश पत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्याची दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायची आहे.
– प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे.
– प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (Duplicate)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे.
– फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.

हेही वाचा :  दहावीच्या ऑफलाइन परीक्षेच्या भीतीने अपहरणाचा बनाव

खबरदार! परीक्षार्थींना खाली बसविल्याचे आढळल्यास शाळेला एक लाख दंड; मान्यताही होणार रद्द

परीक्षेचे वेळापत्रक

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

दहावी-बारावी परीक्षांसाठी मोठ्या खोल्यांमध्ये झिग-झॅग बैठक

JEE Mains 2022: यंदा जेईई मेन परीक्षा चार वेळा नाही? विद्यार्थ्यांना केवळ दोन अटेंप्ट मिळण्याची शक्यता

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …