स्पॅनिश आणि फ्रेंच सर्टिफिकेट अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम इग्नूची अधिकृत वेबसाइट ignuiop.samarth.edu.in वर जा. नवीन युजर्स असाल तर आधी नोंदणी करा. यानंतर सर्व आवश्यक तपशील भरा आणि शुद्धलेखन किंवा तथ्यात्मक त्रुटी नसेल याची खात्री करा. इग्नूकडे मागण्यात आलेले दस्तावेज अपलोड करा. त्यानंतर क्रेडिट कार्ड (मास्टर/व्हिसा), डेबिट कार्ड (मास्टर/व्हिसा/रुपे) किंवा नेट बँकिंगद्वारे अर्ज आणि नोंदणी शुल्क भरा. यानंतर सबमिटवर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी पेज सेव्ह करा.
असा करा अर्ज
इग्नूने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, मान्यताप्राप्त संस्थेतून हायस्कूल (१०+२) उत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवारांकडे इंग्रजीचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांना इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक माहिती मिळू शकणार आहे.
इग्नूतर्फे विविध अभ्यासक्रम
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (Indira Gandhi National Open University, IGNOU) कृषी क्षेत्रातील (Agriculture field) तीन नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यानुसार विद्यापीठाने फूड एमएससी इन फूड सेफ्टी अँड क्वालिटी मॅनेजमेंट (MSc in Food Safety and Quality Management, MScFSQM), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्रीबिझनेस (Post Graduate Diploma in Agribusiness, PGDAB), डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर (Diploma in Horticulture, DHORT) हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
यासोबतच उमेदवार फूड सायन्स (Food Science), फूड टेक्नॉलॉजी जी (Food Technology), पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग, (Post Harvest Technology, Engineering)होम सायन्स, (Home Science),लाइफ सायन्स (Life Science), मायक्रोबायोलॉजी (Microbiology), बायोकेमिस्ट्री (Biochemistry), बायोटेक्नॉलॉजी (Biotechnology), हॉर्टिकल्चर (Horticulture), डेअरी टेक्नॉलॉजी (Dairy Technology), व्हेटरनरी मेडिसिन (Veterinary Medicine), फिशरीज (Fisheries), हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) यांसारख्या अभ्यासक्रमामध्ये यूजी आणि पीजी डिप्लोमासाठी अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा