पहिली शिफ्ट सकाळी १० ते १ या वेळेत आणि दुसरी शिफ्ट दुपारी २ ते ५ या वेळेत असेल. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना टीईई टर्म एन्ड परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर पाहू शकणार आहे. परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे.
इग्नूतर्फे(IGNOU) परीक्षा सुरू होण्याच्या किमान सात दिवस आधी डिसेंबर टीईईसाठी इग्नू प्रवेशपत्र २०२१ (Admit Card) जाहीर केले जाणार आहे. इग्नू २०२१ (IGNOU 2021) हॉल तिकीट इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवारांना लॉगिन पोर्टलमध्ये त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स भरुन इग्नू २०२१ डिसेंबरचे टीईईचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर
डिसेंबर टीईई २०२१ डाउनलोड करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेले सर्व तपशील तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास, त्यांनी त्वरित विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. इग्नूने जानेवारी सत्रासाठी इग्नू २०२२ नोंदणी अर्ज भरण्याची आणि सबमिट करण्याची अंतिम मुदत २१ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी इग्नूसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२२ होती.. इग्नू पीएच.डी. प्रवेश परीक्षा २४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.
इग्नूने अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ऑनलाइन एमबीए ते अनेक मास-कम्युनिकेशनसह अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार या सत्रासाठी प्रवेश घेऊ शकतात.
वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा