SBI Bank Job: कोणतीही परीक्षा नाही, एसबीआय बॅंकेत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

SBI Bank Job: बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. येत्या वर्षात तुम्हाला बॅंकेत नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये एकूण १४३८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. कलेक्शन फॅसिलेटरची एकूण ९४० तर रिटायर्ड क्लरिकल स्टाफची ४९८ रिक्त पदे भरले जाणार आहे. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सेवानिवृत्त बॅंक अधिकारी/कर्मचारी या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.

कलेक्शन फॅसिलिटर कलेक्टर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. जेएमजीएस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. तर एमएमजीएस-II, एमएमजीएस-III पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भरती, इच्छुकांनी थेट ‘येथे’ पाठवा अर्ज
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  अंगणवाडी सेविकांना दुहेरी आनंद, २० हजार पदे भरण्यासोबत मानधनही दुप्पट?

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

२२ डिसेंबर २०२२ पासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना १० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

IDBI Bank Job: आयडीबीआय बॅंकेत नोकरीची संधी, ‘ही’ घ्या अर्जाची लिंक
IREL Recruitment: आयआरईएलमध्ये विविध पदांची भरती, मुंबईत नोकरीसोबत मिळेल १ लाख ८० हजारपर्यंत पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …