Weight Loss Tips: काय आहे ८०/२० नियम, कसे होते वजन कमी

वाढलेले वजन ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होताना दिसून येतो. हृदयरोग, मधुमेह यासारख्या आजारापासून मानसिक आजारांपर्यंत सर्वालाच वाढलेले वजन कारणीभूत ठरते. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हीही जर वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर वेळी वजन कमी करण्याचे उपाय सुरू करा. अन्यथा, तुमच्या आरोग्यासाठी ही गंभीर समस्या ठरते. जास्त वजनाच्या समस्येने त्रस्त रूग्णांसाठी ८०/२० नियम अत्यंत लाभदायक मानण्यात आला आहे. आम्ही हा व्हिडिओ न्यूट्रिशनिस्ट नमामी अगरवाल यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून पाहिला आणि वजन नियंत्रणात राहण्यासाठी हा नियम कसा फायदेशीर ठरतो याबाबत अधिक माहिती घेतली आणि तीच तुमच्यासाठी आम्ही या लेखातून देत आहोत.

काय आहे ८०/२० नियम?

हा नियम पेरेटो सिद्धांतावर आधारित आहे. आरोग्य विशेतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य आहार घेतल्यास केवळ वजनच नियंत्रित राहात नाही तर अनेक गंभीर आजारांच्या धोक्यापासूनदेखील दूर राहण्यास मदत करते. ८०/२० नियमानुसार, ८० टक्के आहारामध्ये निरोगी, पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करावा आणि उरलेल्या २० टक्के आहारामध्ये अन्य पदार्थांचे सेवन करू शकता. सर्व वयाच्या व्यक्तींसाठी हा असाच नियम आवश्यक मानला जातो. आता हा नक्की नियम काय आहे याबाबत आपण जाणून घेतले. पण ८० टक्के आणि २० टक्के आहार नेमका कसा असावा असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. मग आता त्याबाबत आपण जाणून घेऊया.

हेही वाचा :  94 किलो मुलाने ही साधी घरगुती ट्रिक करून घटवलं 25 किलो वजन,दिसू लागला हिरोसारखा Slim-Trim

काय आहे नक्की ८०/२० नियम

असा असावा ८० टक्के आहार

आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या आहारामध्ये ८०% पदार्थ हे धान्य, फळ, भाजी, नट्स आणि बिया या सगळ्यांनी समाविष्ट असायला हवा. तुम्ही तुमच्या आहारामध्ये मासे, चिकन असे प्रोटीनयुक्त पदार्थ समाविष्ट करून घेऊ शकता. ओमेगा – ३ फॅटी अॅसिड आणि कमी चरबीयुक्त असे डेअरी उत्पादन आणि सी-फूड्सदेखील शरीरासाठी आवश्यक मानण्यात येतात. हे पदार्थदेखील तुम्ही आहारात समाविष्ट करून घ्या. जेणेकरून तुमच्या शरीराच्या विकासासाठी आणि वजन नियंत्रित राहण्यासाठी याचा उपयोग करून घेता येईल.

(वाचा – Weight Loss Drink : नवीन वर्षात हवीये सडपातळ कंबर व सपाट पोट? मग पाण्यात घालून प्या हा घरगुती पदार्थ, बघा कमाल)

असा असावा २० टक्के आहार

आहारतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अचानक पूर्णतः आहारातील बदल हा पचनक्रियेसाठी योग्य नाही. तसंच डाएट करणाऱ्या व्यक्तीलाही ते पटकन जमणे शक्य नाही. त्यामुळे बऱ्याचदा वेगवेगळे खाण्याचा मोह होतो आणि म्हणूनच तुमच्या २० टक्के आहारामध्ये अशा काही वेगळ्या पदार्थांचा तुम्ही समावेश करून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही कमी प्रमाणात गोड पदार्थ, तेलकट पदार्थ समाविष्ट करून घेऊ शकता. मात्र त्याला एक विशिष्ट मर्यादा आहे. वास्तविक डाएट फॉलो करताना तुम्ही तुमच्या आहारतज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे कोणते पदार्थ खाऊ शकता हे विचारून ठरवावे.

हेही वाचा :  81 वर्षांनी Library ला परत केलं पुस्तक; 17 व्या पानावर असं काही लिहिलं होतं की कर्मचाऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का

(वाचा – Weight Loss: गुळाचं पाणी पिऊन वजन घटवा, सोपे उपाय)

काय म्हणतात आहारतज्ज्ञ?

वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्हाला निरोगी आहारच आपल्या डाएटमध्ये फॉलो करायला हवा. सध्या अनेक गंभीर आजार केवळ वजन वाढल्यामुळे जडलेले दिसून येतात. यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमच्या तोंडावर आणि मनावरही नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ, विटामिन्स, प्रोटीन आणि खनिजे असणारे पदार्थ असतील याची तुम्ही पुरेपूर काळजी घ्या. यामुळेच तुमचे वजन नियंत्रणात येण्यास मदत होईल. त्यामुळे ८०/२० नियमांचे पालन करताना तुम्ही जास्तीत जास्त पौष्टिक आहाराचेच सेवन करता येईल याकडे लक्ष द्या.

तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी सदर नियम फॉलो करायचा असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच यावर अंमलबजावणी करा. आम्ही हा लेख नियम नक्की काय आहे याबाबत सांगण्यासाठी दिला आहे. तसंच यामध्ये आहारतज्ज्ञांचे मतही दिलेले आहे.

(फोटो क्रेडिटः Canva)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …