proud to be alibagkar ravi shastri zws 70 | अलिबागकर असल्याचा अभिमान – रवी शास्त्री


अलिबाग मांडवा रस्त्यावरील कणकेश्व्र फाटा परीसराचे सुशोभिकरणाचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला.

अलिबाग— तीस वर्षांपुर्वी मी अलिबागला आलो. इथे स्थायिक झालो. इथे येऊन मला जी शांतता मिळते, ती जगात कुठेच मिळत नाही. अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ते कणकेश्व्र फाटा येथे सुशोभिकरण सोहळ्यात बोलत होते.

अलिबाग मांडवा रस्त्यावरील कणकेश्व्र फाटा परीसराचे सुशोभिकरणाचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून ते उपस्थित होते. समिरा उद्य्ोग समुहाकडून या वाहतुक बेटाचे सुशोभिकरण करण्यात आले. या फाटय़ाला चँम्पियन ऑफ चँम्पियन रवी शास्त्री यांचे नाव देण्यात आले. यावेळी  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी वर्ग मोठय़ा संख्येनी उपस्थित होते. 

भारतीय संघात खेळत असतांना मी १९९२ मध्ये मी अलिबागला आलो. आवास सासवणे परीसरात जागा घेतली, तिथेच स्थायिक झालो. या तीस वर्षांत मला अलिबागने जी शातंता दिली. प्रेम दिले ते जगात कुठेच नाही मिळाले असे उद्गार शास्त्री यांनी काढले.

हेही वाचा :  Ukraine War: २१ वर्षीय भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या लष्करी तुकडीत झाला भरती; आई म्हणते, “पाच दिवसांपासून…”

जेव्हा टीम चांगले काम करते तेव्हा लोकांचे प्रेम मिळते. पण जेव्हा टिम हरते तर लोक रागही व्यक्त करतात. अशा ताण तणाव निराशा दूर करण्याचे काम अलिबाग करते. त्यामुळे अलिबागकर असल्याचा सार्थ अभिमान आहे. अलिबाग मध्ये चांगले खेळाडू आहेत. जे आयपीएल, रणजीमध्ये तसेच देशाच्या संघातही स्थान मिळवू शकतात. शकतात. पण त्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहीजे, संधी मिळायला पाहीजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.     

तर शहरी भागातील खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होतात. पण ग्रामिण भागात चांगले खेळाडू असले तरी त्यांना संधी उपलब्ध होत नाहीत. त्यांना मार्गदर्शनही मिळत नाही. ही उणीव भरून काढावी लागेल. त्यासाठी  हैद्राबाद प्रमाणे अलिबागला रवी शास्त्री क्रिकेट अँकेडमी सुरु करावी, राज्य सरकारकडून जी मदत लागेल ती आम्ही उपलब्ध करून देऊ, तालुका स्तरावर आम्ही क्रिडा संकुले तयार होत आहेत. या संकुलांचा चांगले खेळाडू तयार करण्यासाठी वापर करता येईल असा विश्वस यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याचे क्रिडा संकुल अलिबाग येथे विकसीत केले आहे. तिथे खेळाडूंना अधिक सोयी सुविधा देण्याचा प्रय केला जात आहे. यातून चांगले खेळाडू तयार व्हावे हा उद्देश आहे असे मत आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा :  यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेखSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …