७५ रुपयात ब्रह्मास्त्र पाहायचा असेल तर थोडं थांबा! १६ सप्टेंबर नव्हे या दिवशी मिळेल स्वस्त तिकिट

मुंबई: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अयान मुखर्जीनं दिग्दर्शित केलेला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कमाईचा उच्चांक गाठला. सध्या याच सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाला मिळालेल्या यशामुळे बॉलिवूडवर आलेली मरगळ दूर झाली आहे.

या दरम्यान सिनेमाविश्वाला चालना मिळावी याउद्देशानं मल्टिप्लेक्स असोसिएशननं येत्या १६ तारखेला राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं. त्या दिवशी देशातील बहुसंख्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांना अवघ्या ७५ रुपयांत सिनेमा बघण्याची संधी मिळणार होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार ब्रह्मास्त्रला मिळत असलेला प्रतिसाद पाहून मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं हा दिवस २३ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-प्रार्थना बेहेरेच्या मंगळसूत्राचं हटके डिझाइन पाहिलं का? ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची नेहा फ्लाँट करतेय नवा लूक

दिवस बदलाला कारण…

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं १६ सप्टेंबरला राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे या दिवशी प्रेक्षकांना सिनेमे ७५ रुपयांत बघण्याची संधी मिळणार होती. परंतु आता हा दिवस २३ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (एमएआय) नं राष्ट्रीय सिनेमा दिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे. या दिवशी देशभरातील सिनेमागृहांत प्रेक्षकांना ७५ रुपयांत सिनेमा बघता येणार आहे. आधी हा दिवस १६ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचं ठरवलं होतं. परंतु यात मोठ्या संख्येनं मल्टिप्लेक्स चालकांना सहभागी होता यावं यासाठी हा दिवस १६ ऐवजी २३ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

हे वाचा-रणबीर कपूर अन् कंगनाच नव्हे या बॉलिवूड कलाकारांच्याही आवडीचं आहे Beef!

हा दिवस साजरा करण्यासाठी पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मीरा, सिटीप्राईड, एशियन, मुक्ता ए२, मुवी टाईम, वेव, एम२के आणि डिलाइट सह चार हजारांहून अधिक थिएटरचालक सहभागी दिसणार आहे. राष्ट्रीय सिनेमा दिवसाच्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा देखील प्रेक्षकांना ७५ रुपयांत बघता येणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर आता थिएटर शंभर टक्के क्षमतेनं सुरू झाल्याच्या निमित्तानं आनंदाचं वातावरण आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous टी-२० वर्ल्डकपची तयारी करायची की नवा कोच शोधायचा; दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका
Next ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार ‘हे’ कलाकार; करण जोहरचा मोठा खुलासा

Check Also

प्राजक्ता माळीची इच्छा झाली पूर्ण, सोशल मीडियावर Photo शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात …

अखेर शालिनीच्या पापांचा घडा भरणार; जयदीप गौरी देणार ‘ही’ शिक्षा

मुंबई, 14 सप्टेंबर : स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत सध्या सगळं वातावरण …