VSI Recruitment 2022: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भरती, १ लाख ८४ हजारपर्यंत मिळेल पगार

VSI Pune Recruitment 2022:वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (Vasantdada Sugar Institute Pune) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रमुख (Principal Scientist & Head) आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ (Senior Scientist) ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

प्रिंसिपल सायन्टिस्ट हेडचे एक पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमएससी (अॅग्रीकल्चर) आणि पीएचडी इन अॅग्रीकल्चर, प्लांट ब्रिडींगचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा ८ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाख ८४ हजार ४३५ रुपये पगार दिला जाणार आहे.

मुंबईतील स्मॉल कॉज कोर्टात ७ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
RailTel Recruitment: रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती
सिनिअर सायन्टिस्टचे एक पद भरले जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमएससी अॅण्ड पीएचडी इन बॉटनी/बायोटेक्नोलॉजी/अॅग्रीकल्चर अॅण्ड बायोटेक्नोलॉजीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा ८ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाख ३८ हजार ६३२ रुपये पगार दिला जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती, २८ हजारपर्यंत मिळेल पगार
उमेदवारांनी आपले अर्ज महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जि.पुणे ४१२३०७ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. २० एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

सिनिअर सायन्टिस्ट अॅण्ड हेड पदाचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिनिअर सायन्टिस्ट पदाचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

NTRO job 2022: ‘ही’ भाषा येत असेल तर परीक्षेशिवाय मिळेल नोकरी, ४८ हजारपर्यंत पगार
ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी, ७० हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Indian Post : टपाल विभागात भरतीची नवीन अधिसूचना जारी, 10वी पाससाठी संधी
Next टायर बनवणाऱ्या कंपनीने स्विकारली टूथ ब्रश टेक्नॉलॉजी, खराब झाल्यावर बदलणार पहिला रंग

Check Also

Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडविभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी …

दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याणविद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची …