द कश्मीर फाइल्सबाबत इफ्फीच्या ज्युरीनं केलेल्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

The Kashmir Files: 53 व्या इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीचे अध्यक्ष नदाव लॅपिड यांनी द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत एक वक्तव्य केलं. इफ्फी सोहळ्याच्या सांगता समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड हे म्हणाले, ‘द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब आहे तसेच हा चित्रपट हा प्रपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे.’ नदाव यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आता नदाव यांच्या वक्तव्यावर द कश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री? 

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून त्यांनी नदाव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गोव्यातील इफ्फी 2022 मध्ये एक ज्युरी म्हणाले की, ‘द कश्मीर फाईल्स हा चित्रपट वल्गर आणि प्रपोगंडा चित्रपट आहे.  माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही कारण दहशतवाद्यांचे सर्व समर्थक आणि भारताचे तुकडे करू इच्छिणारे लोक नेहमीच असे बोलत असतात.पण माझ्यासाठी सर्वात आश्चर्याची गोष्ट ही आहे की, भारत सरकारनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अशा वक्तव्यांचा सपोर्ट केला गेला. 700 लोकांची मुलाखत घेऊन तयार करण्यात आलेला हा चित्रपट आहे.जी भूमी पूर्णपणे हिंदू भूमी होती, आज तिथे हिंदू राहत नाहीत. ही  प्रोपगंडा आणि वल्गर गोष्ट आहे का?’ 

हेही वाचा :  'यशोदा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

विवेक अग्निहोत्रींनी केलं चॅलेंज

News Reels

‘त्यामुळे आज मी जगातील तमाम अर्बन नक्षलवाद्यांना चॅलेंज करतो आणि इस्राइलमधून आलेल्या त्या महान चित्रपट निर्मात्यांनाही चॅलेंज करतो की,  ‘द काश्मीर फाईल्स’चा एक शॉट, एक डायलॉग, एक प्रसंग हा खोटा असं त्यांनी सिद्ध केलं. तर मी चित्रपटांची निर्मिती करणं बंद करेल.’

पाहा व्हिडीओ:


‘द कश्मीर फाईल्स’ 11 मार्च 2022  रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. लवकरच द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असंही म्हटलं जात आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

The Kashmir Files: ‘सत्य ही सर्वात धोकादायक गोष्ट’; इफ्फी ज्युरी नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यानंतर विवेक अग्निहोत्रींचे पहिले ट्वीट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …