जया किशोरीने केले नात्याबाबत असे वक्तव्य, सांगितले प्रेमात घाई योग्य नाही

Jaya Kishori Motivation Speaker: सध्या अनेक जणांना जया किशोरी यांचे तत्वज्ञान आपलेसे वाटते आणि ऐकत राहावेसे वाटते. देशातील प्रसिद्ध प्रेरणात्मक तत्वज्ञांनीपैकी एक आहे. त्यांच्या भजन आणि कथांसह विचारही पटणारे असतात. अनेक गोष्टींवर जया किशोरी यांचे विचार हे प्रेरणात्मक असून विचार करायला लावणारे आहेत. यापैकीच आहे प्रेम आणि नातं.

प्रेम आणि नातं हे वेगळंच समीकरण आहे. याबाबत प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो. जया किशोरींनीदेखील याबाबत आपले मत मांडले आहे. प्रेम आणि नात्यात नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्रास होत नाही याबाबत त्यांनी सांगितले आहे. घ्या जाणून (फोटो सौजन्य – @iamjayakishori Instagram/iStock)

जया किशोरी काय म्हणतात प्रेमाबद्दल

वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे

वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे

​जया किशोरी यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रेमाच्या या नात्यात सर्वात पहिले आपल्याला वेळेबाबत लक्ष ठेवायला हवे. अर्थात आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण केवळ मशीन्सप्रमाणे काम करत राहतो. आताच्या आता सर्व कामं पूर्ण करायच्या मागे लागतो. यामुळे अनेक जण संयम विसरत चालले आहेत. पण थोडं थांबा. कारण प्रेमात थोडा वेळ लागतो. हा वेळ तुम्ही तुमच्या नात्याला देणं अत्यंत आवश्यक आहे. वेळ दिला नाही तर नातं फुलत नाही.

हेही वाचा :  किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर

घाईघाईत नातं बिघडतं

घाईघाईत नातं बिघडतं

प्रेमाला वेळ दिला नाही तर घाईघाईमध्ये नातं नक्कीच बिघडतं असंही जया किशोरी यांनी सांगितले आहे. एकमेकांना समजून घेण्यासाठी नात्यात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे नातं अधिक घट्ट होण्यास मदत मिळते. तुम्ही जर एकमेकांना वेळ देऊन समजूनच घेतले नाही तर नात्याचा पायचा भक्कम होत नाही आणि घाईघाईत जसा एखादा पदार्थ बिघडतो तसंच नातंही बिघडतं.

(वाचा – शिखर धवन म्हणतोय लग्न करणं ही चूकच, घटस्फोट का घ्यावा लागतो नक्की काय घडतात चुका)

प्रेमाचा ताप उतरायला वेळ लागत नाही

प्रेमाचा ताप उतरायला वेळ लागत नाही

याशिवाय जया किशोरी यांनी असेही सांगितले आहे की, प्रेमाचा ताप हा लवकर चढतो आणि प्रेमाचा ताप तितक्यात लवकर उतरतोही. सुरूवातीला प्रेमात सर्वच चांगलं वाटतं. मात्र आपल्या जोडीदाराच्या सवयी, बोलण्याची पद्धत, व्यवहार आणि काम करण्याची पद्धत या सगळ्यामुळे नातं टिकून राहातं. प्रेम करणं सोपं आहे मात्र निभावणं अत्यंत कठीण आहे.

(वाचा – धर्माची सीमा ओलांडून विवाहित पुरूषाच्या पडली होती प्रेमात, या मराठमोळ्या अभिनेत्रीला कधीच नात्यात नाही मिळाले प्रेम)

नात्याचं ओझं होऊ देऊ नका

नात्याचं ओझं होऊ देऊ नका

सुरूवातीला एकमेकांच्या बाबतीत प्रेमाच्या पडद्यामुळे काहीच चुका दिसत नाही. मात्र हळूहळू एकमेकांना समजून घेताना मग त्रास होऊ लागतो. आधी छोटी छोटी भांडणं, रूसणं, एकमेकांना समजून घेणं सर्वकाही होत असतं. पण २-३ वर्षाच्या नात्यानंतर हीच भांडणं मोठी होतात आणि नातं बिघडायला सुरूवात होते. त्यामुळे एकमेकांना समजून घ्या, नात्याचं ओझं होऊ देऊ नका.

हेही वाचा :  हार्दिक पांड्याला पर्याय, ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात, 'या' खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा

(वाचा – ट्रॅड वाईफ म्हणजे काय? काय आहे हा जुन्या संकल्पनेचा नवा ट्रेंड तुम्हाला माहीत आहे का)

प्रेमात काय महत्त्वाचे – जया किशोरी

निःस्वार्थ प्रेम

निःस्वार्थ प्रेम

कोणत्याही स्वार्थाशिवाय करण्यात आलेलं ते प्रेम. जर स्वार्थ असेल तर प्रेम कधीच शेवटपर्यंत पोहचू शकत नाही. नात्यात एकमेकांना साथ देणं, निःस्वार्थी राहणं हेच खरं प्रेम आहे. एखाद्यावर प्रेम का आहे याचं काही कारण असूच शकत नाही त्यालाच प्रेम म्हणतात. जर असं राहता आलं तर प्रेमात जिंकता येतं.
तुम्हीही प्रेमात असाल तर दूरदृष्टी ठेवा. निभावता येणार असेल तरच प्रेम करा. उगीच एखाद्याला पुढे त्रासदायक ठरेल असे निर्णय घेऊ नका.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …