हनिमून झाल्यावर सर्वकाही संपलं, या नात्यात मला गुदमरल्यासारखे वाटतंय मी काय करु

प्रश्न: आमचा प्रेमविवाह झाला होता. लग्न होण्यापुर्वी आम्ही एकमेकांनी ४ वर्ष डेट करत होते. पण आमच्या हनिमूनच्या रात्री नंतर सर्व काही बदलून गेले. त्या रात्रीनंतर मला वाटत आहे की माझ्या संपूर्ण आयुष्य माझी पत्नीच नियंत्रीत करत आहे. खरं तर मी कोणाशी बोलत आहे. काय करतो या गोष्टीवर तिची बारीक नजर असते. मला फोन आल्यास तिच्या नजरा माझ्या फोन कडे जातात. तिच्या अनुपस्थितीत मी माझ्या स्वतःच्या चुलत बहिणींशी बोलू शकत नाही. एके दिवशी तर हद्द झाली मी मॉलमध्ये जात असताना माझी जुनी मैत्रीण भेटली. मी तिच्याशी बोललो पण त्यानंतर माझी पत्नी खूपच बदलली ती माझे व्हॉट्सअ‍ॅप तपासू लावले. ही म्हणजे हद्दच झाली आता या नात्यात मला गुदमरल्यासारखे वाटू लागले आहे. मी हे लग्न संपवू का ? (फोटो सौजन्य : istock)

​डॉक्टरांचा सल्ला

यावेळी डॉ मलिहा हाशम साबळे सांगतात की दोन लोकांमधील नातेसंबंध ते पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समज आवश्यक आहे. परंतु त्याच वेळी, प्रयत्न परस्पर असले पाहिजेत आणि समज परस्पर असावी. प्रत्येक नात्यात काही सीमा असतात, कोणालाही त्यांचे स्वातंत्र महत्त्वाचे असते. लग्नासारख्या पवित्र बंधनात आपण एकमेकांवर अवलंबून असतो. अशात एकमेकांवर विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या नात्यात एकमेकांनी समजून घेणं महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  Crime News : वाद क्रिकेटच्या मैदानात, पण राडा घरात! भावानेच दोन लहान बहिणींना केले रक्तबंबाळ

लग्नानंतर दोघांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते. यानात्यात कोणी बरोबर कोणी चुक असे काही नसतं त्यामुळे तुम्ही एक टीम आहात ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तुम्ही दोघांना सामोरे जायचे आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा.

​संवाद महत्त्वाचे साधन

कोणत्याही नात्यात संवाद फार महत्वाचा असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुमच्या नात्यातील संवाद हरवून देऊ नका. कोणीतरी भावनिकदृष्ट्या आपल्यासोबत आहे ही भावना समोरच्या व्यक्तीला धीर देते. तुमच्या केसमध्ये देखील तुम्ही तुमच्या पत्नीसोबत बोलू शकता. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मनात तुम्ही त्यांना सोडून जाल अशी भीती आहे. ही भीती काढण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागती. (वाचा :- इन्स्टाग्रामचा DP बदलत IAS टीना डाबी व्यक्त केले पतीप्रती असणारे प्रेम, लव्हस्टोरीतून या गोष्टी शिकण्यासारख्या )

​टाळी एका हाताने वाजत नाही

मराठीत म्हण आहे ना टाळी कधी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे तुमच्या वागण्यातील काही गोष्टी त्यांना खटकत असतील त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांच्या मनात असलेली गोष्टीचा नाश करु शकता. (वाचा :- माझी कहाणी: माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु? )

हेही वाचा :  लग्नाआधीच होणा-या सूनेकडून मागितली किडनी, ‘या’ 3 महिलांनी सांगितल्या काळीज पिळवटून टाकणा-या कहाण्या..!

​परिवाराची मदत

या संदर्भात तुम्ही परिवारीची मदत घेऊ शकता. तुम्ही त्यांना पटवून द्या की तुम्ही त्यांनी सोडून कुठेच जाणार नाही. त्याच प्रमाणे त्यांना स्वत:च्या पायावर उभ राहण्यास मदत करा.यामुळे तुम्हाला भविष्यात कोणता त्रास जाणवणार नाही. (वाचा :- माझी कहाणी: माझ्याकडे ती एक गोष्ट नाही म्हणून माझी पत्नी मला डोळ्यासमोर उभं करत नाही, काय करु?)

​त्यांच्या सोबच चांगला वेळ घालवा

यापुढे मी तुम्हाला एवढच सांगेन की तुम्ही त्यांच्या सोबत चांगला वेळ घालवा. यामुळे त्यांच्या मनात असणाऱ्या भावना कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तुम्हा दोघांनीही एकमेकांना समजण्यासाठी वेळ मिळेल. सर्व गोष्टी मोडल्याने संपत नाहीत. आयुष्य जगण्याची मजा नाती जोडण्यात आहे. त्यामुळे तुमच्या पत्नीला ही गोष्ट समजण्यासाठी थोडा वेळ द्या. (वाचा :- माझी कहाणी : नवरा गेला अनं होत्याचं नव्हतं झालं, बाबा कुठे आहे मुलाच्या निष्पाप प्रश्नांना कसं देऊ उत्तर? )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …