Ukraine Russia War : कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहत आहात – यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Zelenskyy

कीव : रशिया आणि यूक्रेन (Russia-ukraine) यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. दोन्ही देशांमधील युद्धाचा परिणाम जगभरातील इतर देशांवर देखील होत आहे. रशियाला यूक्रेनला गुडघ्यावर आणायचे आहे पण यूक्रेन शरणागती पत्करायला तयार नाही. दरम्यान भारताकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरू आहे.

आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी लढा देत, युक्रेनच्या नेत्याने शनिवारी अमेरिकेच्या खासदारांना आपल्या सैन्यात आणखी लढाऊ विमाने पाठविण्याचे आवाहन केले. तसेच रशियन तेल आयात कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन केले. झेलेन्स्कीन (Volodymyr Zelenskyy) यांनी यूएस खासदारांसह एक खाजगी व्हिडिओ कॉल सुरू केला आणि असे म्हटले की कदाचित त्यांना जिवंत पाहण्याची ही शेवटची वेळ असेल. ते राजधानी कीवमध्ये आहे.

यूक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Volodymyr Zelenskyy) यांनी माहिती दिली की त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली. ते म्हणाले की, बायडेन (Joe Biden) यांच्याशी संरक्षण, आर्थिक मदत आणि रशियावरील निर्बंधांवर चर्चा झाली.

युरोपियन युनियनने युक्रेनला आर्थिक मदत पाठवली आहे. पहिल्या हप्त्यात, युरोपियन युनियनने यूक्रेनला 500 दशलक्ष युरो किंवा 4 हजार 175 कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठवली आहे. यूक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आर्थिक मदतीबद्दल युरोपियन युनियनचे आभार मानले आहेत. झेलेन्स्की म्हणाले की, जे पळून गेले होते त्यांना त्यांची घरे परत तयार करण्यास मदत होईल.

हेही वाचा :  पंतप्रधान मोदींचा खादीत स्वदेशी कपडांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट​ पाहा फोटो

हंगेरीमध्ये (Hungary) आज (रविवारी) ऑपरेशन गंगा (Operation Ganga) जवळपास पूर्ण होणार आहे. आज 5 उड्डाणे हंगेरीहून भारतात परतणार आहेत. या फ्लाइट्समधून आज सुमारे 800 विद्यार्थी भारतात येणार आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे देखील आजच्या शेवटच्या विमानातून भारतात परतणार आहेत.

यूक्रेनचे परराष्ट्र मंत्री कुलेबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांना आवाहन केले आहे. ‘युद्ध थांबवण्यासाठी तुमचा प्रभाव वापरा आणि पुतीन यांच्याशी बोला.’



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …