व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय पण तुमचा जोडीदार सतत ex बद्दल बोलत राहतो? चिडचिड करु नका अशा प्रकारे करा हॅंडल

कोणत्याही नात्यात वाद होणे ही खूपच सामान्य गोष्ट आहे. तुमच्या जोडीदाराची प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटले असे होत नाही. ज्याप्रमाणे प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याप्रमाणे माणसाची मानसिकता देखील वेगळी असते. अशात अनेक जण भूतकाळात अडकून बसतात. अनेक जण सध्याच्या पार्टनची तुलना त्यांच्या EX सोबत करतात. अशावेळी चिडचिड करुन राग व्यक्त करण्यापेक्षा अशी परिस्थिती योग्य पद्धतीने हातळणे गरजेचे असते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचे नाते खराब होऊ शकते त्यामुळे या गोष्टी अतिशय नाजूकपणे हाताळण्याची गरज असते.
चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही अशी परिस्थिती कशा प्रकारे हाताळाल. (फोटो सौजन्य :- Istock)

जोडीदाराच्या भावना समजून घ्या

जोडीदाराच्या भावना समजून घ्या

जोडीदाराला समजून घेणं खूप महत्त्वाचे असते. तुमचा जोडीदार तुमच्याकडे मन मोकळे करतो ही गोष्ट समजून घ्या. त्यामुळे जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याकडे मन मोकळे करेल तेव्हा त्याचे म्हणणे ऐकुन घ्या. या गोष्टीमुळे तुमच्यातील गैरसमज कमी होण्यास मदत होईल. तो त्याच्या EX कडे परत जात नाही आहे त्याचे मन मोकळे करत आहे ही गोष्ट लक्षात घ्या.
(वाचा :- अन् रात्री तो गुप्तांगावर…अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत , toxic relationship मधून या मार्गाने पडा बाहेर) ​

हेही वाचा :  माझी कहाणी : माझ्या आयुष्यात दोन पुरुष आहेत, दोघंही माझ्यावर खूप प्रेम करतात मी काय करु

जोडीदाराला जज करु नका

जोडीदाराला जज करु नका

जर तुमचा जोडीदार नेहमीच त्याच्या EX बद्दल बोलत असेल तर चिडचिड करण्यापेक्षा त्याला शांतपणे विचारा त्याच्या मनातील गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. संवादामुळे तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्ट समजण्यास मदत होईल.

(वाचा :- लग्नानंतर १० वर्षांनी अभिनेत्री गरोदर म्हणाली नातेवाईकांनी जगणं हैराण केलं होतं, नात्यासाठी अशी घ्या सुनेची काळजी) ​

नात्यातील मैत्री जपा

नात्यातील मैत्री जपा

तुमचा जोडीदार तुमचा बेस्टफ्रेंड असणं गरजेच आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मैत्रीचे संबंध ठेवा.पार्टनर जर EX चा जास्त विचार करत असेल तर त्याला कारण विचारताना मदत करण्याचेही आश्वासन द्या ज्यामुळे पार्टनरला वाटेल तुम्ही त्यांना समजून घेताय.
(वाचा :- हनिमुनच्या दिवशी विसरुनही करु नका या सामान्य चुका, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप)

तुमच्यामनातील गोष्टी शेअर कारा

तुमच्यामनातील गोष्टी शेअर कारा

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पार्टनला तुमच्या मनातील घालमेल शेअर करा. जेव्हा पार्टनर त्यांच्या EX विषयी बोलतो, तेव्हा तुम्हाला काय वाटतं हे त्याला सोप्य शब्दात समजावू सांगा.

(वाचा :- माझी कहाणी : मला फार एकटं वाटतं, मी ५० वर्षींची आहे पण अजून लग्न झालं नाही मी काय करु)

हेही वाचा :  मेरा वाला अलग है असं म्हणू नकोस ताई, सावध हो!

नकारात्मक प्रभाव पडू शकतो

नकारात्मक प्रभाव पडू शकतो

तुमच्या जोडीदार जर सतत त्याच्या EX चा विषय काढत असेल तर या गोष्टींचा प्रभाव नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तिच्या या बोलण्याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होतोय ही गोष्ट त्यांना समजून सांगा.
(वाचा :- ऋजुता दिवेकरने दिल्या रिलेशनशिप टिप्स म्हणाल्या अशा डाएटपेक्षा खाण्याबद्दल बोलणाऱ्या जोडीदाराला शोधा) ​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …