​घटस्फोटानंतर Malaika Arora एकटीच साजरा करतेय मुलाचा वाढदिवस, Divorce चा मुलांच्या मनावर काय होतो परिणाम?

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मलायका अरोरा मुलगा अरहान खानला सांभाळत आहे. नुकताच मलायकाचा मुलगा अरहान खान २० वर्षांचा झाला. ९ नोव्हेंबर रोजी मलायकाने अरहानचा वाढदिवस साजरा केला.

वाढदिवसादिवशी मलायका अरोराने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमुळे पुन्हा एकदा मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. मलायका आणि अरबाजने घटस्फोट घेतला त्यावेळी अरहान अवघ्या १५ वर्षांचा होता. कुटुंब हळूहळू जिथे कळायला लागतं तिथेच आई-वडिल विभक्त झाले. या सगळ्याचा मुलांवर विपरित परिणाम होतो. अशावेळी पालकांनी नेमकं काय करायला पाहिजे ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​मलायका अरोराची पोस्ट

मलायका अरोराचा मुलगा अरहान खान २० वर्षांचा झाला आहे. ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवसाला मलायकाने एक पोस्ट शेअर केली. “माझं बाळ आता मोठं झालं. एक पुरूष होतोय. पण तो माझ्यासाठी मात्र बाळच राहिलं.” आणि हे अगदी खरं आहे. मुलं कितीही मोठं झालं तरी आईसाठी मात्र तो लहानच असतो. मुलगा आणि आईचं नातं कायमच खास असतं. या नात्यातील वेगळेपण आपण या फोटोंमधून पाहू शकतो.

हेही वाचा :  'माउथ फ्रेशनर' खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

माझ्यासाठी तू कायमच बाळ… मलायकाची पोस्ट

​घटस्फोट घेण्यापूर्वी मुलांशी बोळा

घटस्फोट घेण्यापूर्वी मुलांशी संवाद साधा. घटस्फोटाचा निर्णय हा दोघांचा असला तरीही या सगळ्याचा परिणाम मुलांवर होणार आहे. त्यामुळे मुलांसोबत बोला, चर्चा करा मात्र त्यांच्यासमोर वाद करू नका. मुलं कळत्या वयातील असतील तर त्यांना नात्यातील वेगळेपण आणि त्याचा होणारा त्रास, याबाबत मोकळेपणाने बोला. मुलांना कुणाचं बरोबर कुणाचं चूक असं न सांगता, हा आमचा निर्णय असल्याचं सांगा. एकमेकांबद्दल चुकीच्या भावना मुलांमध्ये निर्माण करू नका.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​घटस्फोटानंतर होणाऱ्या बदलांची मुलांना कल्पना द्या

अनेकदा पालक घटस्फोट घेण्यापूर्वी मुलांशी बोलत देखील असतील. पण घटस्फोटानंतर नक्की मुलांच्या आयुष्यात काय बदल होतो याची कल्पना नसते. अशावेळी घटस्फोटापूर्वी मुलांशी पालकांनी संवाद साधण अत्यंत आवश्यक आहे. घटस्फोटानंतर मुलांसोबत पालकांपैकी एकच व्यक्ती असेल. अशावेळी दुसऱ्या व्यक्तीची कमतरता, त्या व्यक्तीला हवं तेव्हा भेटता न येणं हे सर्वात मोठे बदल होतात. याची जाणीव मुलांना करून द्या.

(वाचा – Alia Bhatt ने लेकीचं नाव आणि जन्माची तारीख आधीच ठरवली होती? ६ नोव्हेंबर आणि ‘हे’ नाव बाळासाठी ठरेल खास))

हेही वाचा :  सेक्स करताना झाला मृत्यू, अन् मग महिलेने जे केले ते वाचून तुम्हाला धक्का बसेल

​मुलांना घाबरू देऊ नका

मुलांसाठी पालकांचा घटस्फोट हे भीतिदायक असू शकतं. एवढे दिवस एकत्र पाहिलेले पालक आता विभक्त होणार याची जाणीव मुलांना नसते. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही सांगितल्यावर ते घाबरू शकतात. आपल्या मित्रांचे पालक एकत्र आहेत पण मग आपले का नाहीत? हा प्रश्न मुलांना पडू शकतं. अशावेळी यामध्ये मुलं म्हणून तुमची काही चूक नाही, याची जाणीव मुलांना करून द्या.

(वाचा – आक्रमक Virat Kohli मध्ये लपलाय संवेदनशील आणि भावनिक ‘बाप’, लेक Vamika साठी असा आहे तिचा ‘विराट बाबा’)

​मुलांच्या मनातील दोष बाजूला करा

मुलं घटस्फोट, त्यामागील कारणं, या परिस्थितीला जबाबदार कोण? हे सगळं समजण्यास लहान असेल. अशावेळी मुलं थोडा टोकाचा किंवा चुकीचा विचार करतील. जसे की, या घटस्फोटाला कोण कारणीभूत आहे? हा प्रश्न त्यांना सतत पडत असेल आणि याच प्रश्नापासून मुलांना लांब करा. तसेच मुलं लहान असतील तर त्यांना एका पालकाची निवड करायची असते. अशावेळी मुलाला वाटेल की, आपण निवड न केलेल्या पालकाला राग येईल. आणि या सगळ्याला तो दोषी ठरवतो. अशावेळी त्यांच्या मनातील हा विचार दूर करा.

(वाचा – अभिनेत्री Urmila Nimbalkarच्या ‘आईपण’ चा अनुभव, बाळाची तुलना करण्यावर बोलली उर्मिला, वाचा ७ टिप्स)

हेही वाचा :  'माझा भाऊ...'; रितेश आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपटासाठी अक्षय कुमारची खास पोस्ट

​पालकांनी निर्णयाची घाई करू नये

घटस्फोट घेणे हा अतिशय टोकाचा निर्णय आहे. कोणत्याही वादावर किंवा समस्येवर हा नक्कीच उपाय ठरू शकत नाही. त्यामुळे पालकांनी घटस्फोटाचा निर्णय घेताना घाई करू नये. जरी घटस्फोटाचा निर्णय तुमचा असला तरीही त्याचे परिणाम मुलांवर देखील गोणार आहेत. अशावेळी शांतपणे विचार करा.

(वाचा – साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने भगवान बुद्धांच्या नावावरून ठेवलं मुलांच नाव, मुलं होईल अतिशय संयमी)

​पालकांनी निर्णयावर ठाम राहावं

घटस्फोटाचा निर्णय हा मुलांसह संपूर्ण कुटुंबाला हादरवरणारा निर्णय असू शकतो. अशावेळी तुम्ही जो काही निर्णय घेताय त्यावर ठाम राहणे गरजेचे आहे. कारण तुमच्या धडसोड वृत्तीचा मुलांच्या मनावर परिणाम होतो. या स्वभावाला बघून मुलं देखील ठामपणे निर्णय घेऊ शकत नाहीत.

(वाचा – ‘आता रडायचं नाही लढायचं’, संजय राऊतांनी मुलगी पूर्वशीच्या साथीचं केलेलं कौतुक, असं फुलतं बाप-लेकीचं नातं))



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …