Kathmandu Dubai Flight Fire: देव तारी त्याला कोण मारी! 35000 फूट उंचीवर विमानाला लागली आग अन्… पाहा Video

Fly Dubai Flight Caught Fire: नेपाळ (Nepal) मोठी बातमी माहिती समोर आली आहे. सोमवारी म्हणजेच 24 एप्रिलला काठमांडू विमानतळावरून (Kathmandu Airport) दुबईला उड्डाण केल्यानंतर फ्लाय दुबई विमानाच्या इंजिनला आग (Dubai Flight Caught Fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली. काठमांडूहून दुबईला जाण्यासाठी हे विमान तयार होतं. काठमांडू विमानतळावरून दुबईला उड्डाण केल्यानंतर विमानाच्या इंजिनला आग लागली. त्यामुळे काठमांडू विमानतळावर एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.

दुबईला जाणाऱ्या या विमानात 120 नेपाळी आणि 49 परदेशी नागरिक होते. मात्र, म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. या दुर्घटनेत एकाही व्यक्तीला इजा पोहोचली नाही. इंजिनला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे सूत्रांचं म्हणणं आहे. त्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली होती, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग लागल्यानंतर विमान परत आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळाली.

विमानाला आग लागल्याची माहिती मिळताच विमानतळावर स्थानिक पातळीवर आणीबाणी जाहीर केली होती. विमान लाँड केल्यानंतर युद्धस्तरावर लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि आग विझवण्याचं काम सुरू केलं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला इजा झाली नाही. सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :  पृथ्वीची दिशा भरकटणार, 2024 हे नवीन वर्ष संकटांचं; बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी

पाहा Video 

दरम्यान, एका इंजिनला आग लागली तरी दुसऱ्या इंजिनच्या मदतीनं ते लँड करु शकतं होतं, त्यामुळे विमानाची दुबई विमानतळाकडे रवानगी झाल्याची माहिती नेपाळच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथरिटीने दिली आहे. दुर्घटना घडली ते बोईंग 7373-800 प्रकारचं विमान होतं, अशीही माहिती देखील मिळाली आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

27 दिवसांचाच इंधनसाठा शिल्लक; सुनीता विल्यम्स यांच्यापुढं अंतराळात नवं आव्हान; NASA कडून व्हिडीओ शेअर

NASA Shares a video : अंतराळ क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि महत्त्वाची संशोधनं करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …