Long Distance Relationship मध्ये कसा कराल व्हॅलेंटाईन डे साजरा, या गोष्टी लक्षात ठेवाल तर भांडणं होणार नाहीत

कोणत्याही प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी Valentine’ Day असो Valentine’s Week असो खूपच महत्त्वाचा असतो. प्रेम खरं तर रोजच व्यक्त करावं पण हे दिवस खास असतात. पण ज्या जोड्या काही कारणामुळे एकमेकांपासून दूर राहतात त्यांच्या मनात ही खंत राहतेच. मग नातं सांभाळताना नक्की कशा पद्धतीने आपल्या जोडीदारासह दूर राहूनही तुम्ही हा खास दिवस साजरा करू शकता, जेणेकरून तुमच्यामध्ये वादविवाद अथवा भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. जाणून घ्या काही सोप्या टिप्स. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​गिफ्ट्स पाठवा​

​गिफ्ट्स पाठवा​

Send Gifts On Valentine’s Day: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी खास गिफ्ट्स दिली जातात. पण जोडीदार दूर आहे म्हणून नाराज होऊ नका अथवा जोडीदारालाही नाराज करू नका. आजकाल ऑनलाईन गिफ्ट्स ऑर्डर करणे आणि जोडीदाराला सरप्राईज देणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या घरी अथवा ऑफिसमध्ये लहानसे का असेना पण आवडीचे गिफ्ट नक्की पाठवा. त्यात खास मेसेज लिहायलाही विसरू नका. यामुळे नाते अधिक बहरण्यास मदत होते.

हेही वाचा :  Valentine Day 2023: व्हॅलेंटाईन डे चा मनोरंजक इतिहास कशी घडली कहाणी आणि का करावा साजरा

​दुरावा जाणवू देऊ नका​

​दुरावा जाणवू देऊ नका​

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या जोडीदारासह रोमँटिक डेट अथवा मुव्ही डेट, कँडल लाईट डिनर असे अनेक प्लॅन आखले जातात. पण जोडीदारच दूर असेल तर मनही उदास होतं आणि खूपच दुरावा जाणवू लागतो. पण तुम्ही इतर कपल्सप्रमाणे नाही हे आधी लक्षात घ्या आमि त्यानुसार Virtual Date प्लॅन करा. एकमेकांच्या आवडीचे जेवण ऑर्डर करून पाठवा आणि व्हिडिओ कॉलवर याचा आनंद घ्या. छान गप्पा मारा. यामुळे दुरावा जाणवणार नाही.

(वाचा – आई होण्यासाठी कोणत्याही लिंगभेदाची गरज नाही, ट्रान्सजेंडर गौरी सावंत अनेक किन्नरांचा आधार )

​कितीही व्यस्त असलात तरीही वेळ काढा​

​कितीही व्यस्त असलात तरीही वेळ काढा​

तुम्ही एकमेकांपासून आधीच दूर आहात. त्यातही वेळ न देणं तुमच्यासाठी अधिक त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे व्हॅलेंटाईनच्या दिवशी तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढून फोनवर बोलणं असो अथवा दिवसभर मधूनमधून एकमेकांची काळजी करत Chat करणंही तुम्हाला मनाला दिलासायदायक आणि आल्हाददायक वाटणारं ठरू शकतं.

(वाचा -लग्नाआधी १० वर्षे लपतछपत केले बायकोला डेट तर परेलच्या ब्रिजवर केले प्रपोज, अंकुश चौधरी दीपाची फिल्मी लव्ह स्टोरी)

​मनातल्या गोष्टी सांगा​

​मनातल्या गोष्टी सांगा​

बरेचदा प्रेम आहे हे माहीत असलं तरीही ते व्यक्त करण्याचीही गरज असते. पण तुम्ही दूर असाल तर रोमँटिक पद्धतीने पत्र पाठवून अथवा नोट्स पाठवूनही तुम्ही हे प्रेम व्यक्त करून आपल्या जोडीदाराला सरप्राईज देऊ शकता. पत्र लिहिता येत नसेल तर चॅटद्वारे मेसेज करा. आपल्या आयुष्यात त्यांच्याशिवाय कोणीच महत्त्वाचं नाही हे पुन्हा त्यांना जाणवू द्या.

हेही वाचा :  सेक्सनंतर भांडण झाल्याने पॉर्नस्टारची हत्या; पोलिसांनी नाही तर चाहत्याने पटवली ओळख

(वाचा – नणंद आणि भावजयीचे नाते होईल अधिक मैत्रीचे, ईशा-श्लोका अंबानीच्या नात्यातून घ्या प्रेरणा)

​फोटोंचे कोलाज आणि जुन्या आठवणींना उजाळा​

​फोटोंचे कोलाज आणि जुन्या आठवणींना उजाळा​

तुमच्या भेटींचे आठवणींच्या फोटोजचे तुम्ही कोलाज करा आणि ते तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पोचेल अशा पद्धतीने पाठवा. त्यानंतर फोन करून अथवा व्हिडिओ कॉलवर आठवणींना आणि त्या गोड क्षणांना उजाळा द्या. ज्यामुळे तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन उत्तमरित्या साजरा करू शकता.

नातं जपणं हे आपल्याच हातात असतं. भांडणं ही होतातच. पण प्रेमाच्या दिवशी भांडण्यापेक्षा जे क्षण आहेत, ते तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने साजरे करा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …