Valentine Day 2023: व्हॅलेंटाईन डे चा मनोरंजक इतिहास कशी घडली कहाणी आणि का करावा साजरा

Valentines Day 2023: प्रेम आणि काळजी नसेल तर कोणत्याही नात्याला अर्थ राहत नाही आणि हे नातं जर जोडीदारासह असेल तर या दोन्ही भावनांची गरज भासते. प्रेम व्यक्त करण्यासाठी नक्कीच कोणत्याही मुहूर्ताची अथवा वेगळ्या दिवसाची गरज नाही असं अनेकांना वाटतं. मात्र Valentines Day हा खास प्रेमाचा दिवस १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. एखाद्या सणासारखे स्वरूप या दिवसाला गेले काही वर्ष आले आहे. पण प्रेमाचा दिवस म्हणून हाच दिवस नक्की का निवडला गेला, यामागील इतिहास नक्की काय आहे हे जाणून घ्यायची जर तुम्हाला उत्सुकता असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. (फोटो सौजन्य – Canva)

​काय आहे व्हॅलेंटाईनचा अर्थ?​

​काय आहे व्हॅलेंटाईनचा अर्थ?​

Valentine Day Meaning: आपल्याकडे रक्षाबंधन, ईद, दिवाळी, ख्रिसमस सगळ्या धर्माचे सगळे सण साजरे होतात आणि त्यात भर पडली ती व्हॅलेंटाईन डे ची. प्रेमाचा सण म्हणजे व्हॅलेंटाईन डे. या दिवसाचा अर्थ म्हणजे या दिवशी आपल्या प्रेमासाठी सगळेच वेळ काढतात आणि या दिवशी प्रेम व्यक्त करतात. किमती वेळेतून आपल्या प्रेमासाठी भेटवस्तू, वेळ देणे हे महत्त्वाचे मानले जाते. व्हॅलेंटाईन डे एकच दिवस साजराकेला जात नाही तर पूर्ण आठवडा वेगवेगळे दिवस यामध्ये साजरे करण्यात येतात. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा साजरा करण्यात येतो.

हेही वाचा :  हेच खरं Valentine!लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात किडनी खराब, पतीने अस दिलं जीवनदान

​काय आहे व्हॅलेंटाईन डे चा इतिहास​

​काय आहे व्हॅलेंटाईन डे चा इतिहास​

वॅलेंटाईन हे केवळ एकाच दिवसाचे काम नाही, तर एका पाद्रीचे नाव होते, जो रोम शहरात राहात होता. त्यावेळी रोममध्ये राजा Claudius चे शासन होते. मात्र या शासकाने रोममधील कुटुंब असणाऱ्या व्यक्तींना सेनेत येण्यासाठी जबरदस्ती केली होती. याशिवाय पुरूषांवर लग्न करण्यासाठीही बंदी घालण्यात आली होती. ही गोष्ट कोणालाही पटली नव्हती मात्र यावर कोणीच भाष्य केले नाही.

​काय केले व्हॅलेंटाईनने​

​काय केले व्हॅलेंटाईनने​

या शासकाने नियम काढल्यानंतर पाद्री वॅलेंटाईनलादेखील पटले नव्हते. एकदा एक जोडपे लग्न करण्यासाठी आले असता, एका खोलीत व्हॅलेंटाईनने त्या दोघांचे लग्न लावले. पण हे शासकाला कळले आणि यामुळे व्हॅलेंटाईनला पकडून कैद करण्यात आले व त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पाद्री जेलमध्ये असताना त्याला अनेक लोकांकडून गुलाब आणि भेटवस्तू मिळू लागल्या. आम्ही सर्व प्रेमावर विश्वास ठेवतो अशा आशयाचे संदेश त्याला देण्यात आले.

​फाशीचा दिवस होता १४ फेब्रुवारी ​

​फाशीचा दिवस होता १४ फेब्रुवारी ​

व्हॅलेंटाईनच्या फाशीचा दिवस होता १४ फेब्रुवारी, २६९ ए. डी., मात्र त्याने मरण्यापूर्वी एक पत्र लिहिले, ज्यामध्ये प्रेमासाठी आपण आपला जीव ओवाळून टाकत आहोत हे स्पष्ट केले होते. प्रेम हे सर्वस्व असून प्रेमासाठी वाट्टेल ते झेलण्याची आपली तयारी असल्याचेही त्याने यामध्ये नमूद केले होते असं सांगण्यात येते. म्हणूनच जगभरात १४ फेब्रुवारी हाच दिवस व्हॅलेंटाईनच्या आठवणीनिमित्त व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो.

हेही वाचा :  Chocolate Day 2023 : जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, आयुष्यभराचा पगारही पुरणार नाही, वाचा किंमत!

​व्हॅलेंटाईनचे काही खास प्रश्न​

​व्हॅलेंटाईनचे काही खास प्रश्न​

व्हॅलेंटाईन डे कधी साजरा होतो?

१४ फेब्रुवारी रोजी दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा होतो

व्हॅलेंटाईन डे चा इतिहास काय आहे?

व्हॅलेंटाईन डे ची सुरूवात ५ व्या शताब्दीपासून रोमन फेस्टिव्हलदरम्यान झाली.

व्हॅलेंटाईन डे चा अर्थ काय आहे?

प्रेमी प्रेमिकांनी एकमेकांना आपल्या मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …