मुलांना नम्रपणा शिकवायचा असेल तर सुधा मूर्तींनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा

पालकत्व हे कधीच सोपे नसते. मुलांच संगोपन करताना पालकांना अनेक प्रश्न पडतात. अशावेळी मोठ्यांच मार्गदर्शनच कामी येतं. पालक म्हणून आपणही गोंधळतो. मुलांना नम्रता, करूणा यासारखे गुण शिकविणे देखील तितकेच महत्वाचे असते. पण या सगळ्या गोष्टी मुलांना कशा शिकवाव्यात असा पालकांना प्रश्न पडतो. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या या ५ टिप्स जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

मदत घ्यायला कधीही लाज वाटू नका

मदत घ्यायला कधीही लाज वाटू नका

अनेकदा पालक मुलांना सगळ्या गोष्टी शिकवितात पण नम्रतेने मदत कशी घ्यायची हे शिकवत नाही. पालक म्हणून मुलांना काही गोष्टी आपणहून शिकवायला पाहिजेत. जसे की, दुकानात गेल्यावर भाव करणे. किंवा कुणाकडून मदत हवी असेल तर मनापासून आपली गरज सांगणे. तसेच जर आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर त्यासाठी थोडा भाव तोलमोल करणे योग्य आहे. हे पालकांनी मुलांना व्यवस्थित समजवायला हवं. स्वतः सुधा मूर्ती यांनी देखील अनेकदा अशी मदत घेतली आहे. हे सांगायला त्या अजिबातच लाजत नाही.

हेही वाचा :  Smartphone Explode : हीच 'ती' ८ कारणं ज्यामुळे स्मार्टफोनचा स्फोट होतो, 'अशी' घ्या काळजी

(वाचा – CBSE, ICSE आणि IB यापैकी कोणत्या बोर्डच्या शाळेत मुलांना प्रवेश घ्यायचा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर)​

भौतिक गोष्टींचे ज्ञान

भौतिक गोष्टींचे ज्ञान

जीवनशैलीबाबत सुधा मूर्ती सांगतात की, बदलत्या काळानुसार आणि परिस्थितीनुसार काही बदल करणे गरजेचे असते. प्रत्येक पालकांनी मुलांना या गोष्टी शिकविल्या पाहिजेत. कारण जर पालकांनी मुलांना या गोष्टी शिकविल्या तर त्यांना परदेशात शिक्षण घेताना किंवा नोकरी दरम्यान तडजोड करायला मदत होते.
जीवनातील अपग्रेड इतर लोकांच्या अपग्रेडपेक्षा वेगळे असू शकते. माझ्यासाठी अपग्रेड करणे हे मला आवडते आणि माझी आवड म्हणजे ज्ञानाचा शोध आहे, असं सुधा मूर्ती सांगतात.

(वाचा -तुमची डिलिव्हरी डेट जवळ आलीय? नॉर्मल प्रसूतीपेक्षा C-Section उत्तम पर्याय, जाणून घ्या यामागची कारणं)​

जीवन जगणे महत्वाचे

जीवन जगणे महत्वाचे

मुलांना पालकांनी कायम जीवन आनंदाने जगले पाहिजे, हे सांगावे. कारण पालकांनी मुलांनी भौतिक सुखापेक्षा स्व सुखाची ओळख करून द्यावी. जसे की, महागडे मोबाइल किंवा गॅजेट वापरण्यापेक्षा तुम्ही पुस्तकातून आनंद घेऊ शकता. पुस्तकं हा सर्वात मोठा खजिना आहे.

​(वाचा – C-Section नंतर शरीराचा प्रत्येक अवयव तुटून पडतो, डॉक्टरांनी सांगितली कशी बिघडते नव्या आईची तब्बेत)​

हेही वाचा :  मलायका आणि अरबाजचे पॅरेंटिंग का आहे प्रेरणादायी, घटस्फोटानंतर मुलांना कसे सांभाळावे

मुलांना समाज कार्याचे महत्व शिकवावे

मुलांना समाज कार्याचे महत्व शिकवावे

मी-माझे-मला यासोबतच आपलं असं देखील पालकांनी मुलांना शिकवायला पाहिजे. मुलांना समाज कार्य किंवा समाजाप्रती कृतज्ञता शिकवणं हे पालकांचे कर्तव्य आहे. आपल्या मुलाने कायम सगळ्यांचा विचाक करून वागावे असं वाटत असतं. यासाठी पालकांनी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या टिप्सनुसार वागावे.

(वाचा – पायलट लेकीने वडिलांचा आशिर्वाद घेत उडवलं विमान, तरूणीच्या व्हिडीओने सगळ्यांचेच पाणावले डोळे)​

चार भिंती बाहेरचं जग दाखवाव

चार भिंती बाहेरचं जग दाखवाव

पालकांनी मुलांना चार भिंती बाहेरच वास्तव दाखवावं. कारण अनेकदा पालक मुलांसाठी एक वेगळं सुरक्षित असं जग तयार करतात. यामुळे मुलांना खरं वास्तव कळतं. यावरून मुलांना आजूबाजूचं परिस्थितीची जाणीव होते आणि ते नम्रतेने आणि सहानभूतीने वागतात.

(इंग्रजीत आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …