8 वर्षाच्या मुलाला पालकांनी जबरदस्तीने रात्रभर पाहायला लावला टीव्ही, टीव्हीचं वेड म्हणून दिली ही शिक्षा

मुलांचा स्क्रिन टाइम हा सगळ्याच पालकांचा प्रश्न आहे. ही समस्या अगदी जगभरातील पालक सहन करत आहेत. मुलांना टीव्ही, मोबाइल पाहताना अगदी वेळेचं भान नसतं. अशावेळी पालकांचा राग अनावर होतो. आठ वर्षाच्या मुलाला टीव्ही पाहण्याचा छंद होता. पालकांनी त्याला याबाबत केलेल्या शिक्षेची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

पालकांनी मुलाला शिक्षा म्हणून रात्रभर टीव्ही पाहायला भाग पाडलं. सध्या या शिक्षेची जोरदार चर्चा होत आहे. हा सगळा प्रकार चीनमध्ये घडला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाला टीव्ही पाहण्यात बराच वेळ घालवताना पाहून पालकांनी त्याला रात्रभर टीव्ही पाहण्यास भाग पाडून शिक्षा केली. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​नेमकं काय घडलं?

पालक घराबाहेर कामासाठी पडले तेव्हा ८ वर्षांचा मुलगा घरीच होता. त्यावेळी पालकांनी त्याला आंघोळ करून गृहपाठ पूर्ण करण्यास सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांनी त्याला ठराविक वेळेपर्यंत झोपायलाही सांगितले होते. मात्र मुलाने असं काहीही न करता तो टीव्हीच पाहत राहिला. पालक घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा 8 वर्षांचा मुलगा अजूनही टीव्ही पाहत होता. मुलाने त्याचा गृहपाठ पूर्ण केला नव्हता किंवा आंघोळही केली नव्हती. त्यानंतर चिडलेल्या पालकांनी त्याला रात्रभर टीव्ही पाहण्याची शिक्षा केली.

हेही वाचा :  "शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

(वाचा – इशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म, नाव जे त्यांच्या कुटुंबाला साजेल असंच…. पाहा नावाचा अर्थ)

​शिक्षेदरम्यान मुलाचं वागणं

मुलगा सुरुवातीला शांत होता आणि त्याने टीव्ही पाहताना स्नॅक्स खाल्ले. रात्रीच्या वेळी तो थकून गेला. त्याने झोपण्यासाठी त्याच्या पलंगावर डोकावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या आईने त्याला परत टीव्ही पाहण्यास भाग पाडलं आणि टीव्ही पाहणे सुरू ठेवले. अहवालानुसार मुलगा त्यानंतर रडलाही मात्र पालक काही ऐकले नाहीत. पालकांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं. त्याला पहाटे 5 वाजेपर्यंत जागे राहायला लावले.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​शिस्त लावण्याकरता पालकांचे कठोर पाऊल

या घटनेमुळे चीनमध्ये पालकत्व आणि शिक्षा यावर जोरदार वादविवाद झाला. काही पालकांनी मुलांना शिस्त लावण्यासाठी कठोर पद्धतींबद्दल त्यांचे समान अनुभव सांगितले. काहींचा असा विश्वास आहे की, कठोर पालकत्वाचा मुलांवर सकारात्मक परिणाम होतो. मात्र इतरांना पालकांची ही शिक्षा अतिशय कठोर असल्याचं जाणवलं.

(वाचा – आताच्या मुलांसमोर नक्की कसं वागायचं हा प्रश्न पडतोय? Sudha Murthy यांच्या पॅरेंटिंग टिप्स नक्कीच मदत करतील)

हेही वाचा :  Savitribai Phule Speech : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणे

पालकत्वाचे नियम

ऑक्टोबर 2021 मध्ये, चीनने मुलांच्या वाईट वर्तनासाठी पालकांना शिक्षा करण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार केला. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक शिक्षण प्रोत्साहन कायद्याच्या मसुद्यात, फिर्यादींना त्यांच्या देखरेखीखालील मुलांमध्ये खूप वाईट किंवा गुन्हेगारी वर्तन आढळल्यास पालकांना फटकारले जाईल आणि कौटुंबिक शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमात जाण्याचे आदेश दिले जातील. मुलांना कसे वागावे याचे शिक्षण देण्यासाठी पालकांना हिंसाचाराचा वापर करण्यास देखील कायदा प्रतिबंधित करतो.

(वाचा – मुलांना एकच खोली शेअर करायला देणं योग्य आहे का? ५ गोष्टी ज्या पालकांना माहित असायलाच हव्यात)

​कठोर पालकत्वाचे आरोग्यावर परिणाम

तज्ञांच्या मते कठोर पालकत्वाचे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतात. मुलांना धमक्या देणं किंवा हिंसक वर्तन करणे अत्यंत चुकीचे आहे.

अशा दबावांमुळे मुलांसाठी इतर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात, जसे की झोप न लागणे, खाण्याचे विकार आणि चिंता. यामुळे कमी आत्मसन्मान आणि खराब शैक्षणिक कामगिरी देखील होऊ शकते. यामुळे पालकांनी मुलांना शिक्षा देताना टोकाचे पाऊल उचलू नये.

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?)

हेही वाचा :  शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी क्लिक करा)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …