जगातील पहिली Beer Powder, दोन मिनिटात मॅगीच नव्हे, बिअरही बनते

Beer Powder : तुमचा या वीकेंडचा प्लॅन काय? असं विचारलं असता नोकरदार वर्गापैकी अनेकजण, आम्ही बुवा घरातच बसून Chill करणार आहोत असं म्हणतील. तर, काहीजण आम्ही अमुक ठिकाणी तमुक मित्रांसोबत पार्टी करणार आहोत असंही म्हणताना दिसतील. पार्टी… मग ती घरात असो किंवा एखाद्या छानशा ठिकाणी जाऊन केलेली असो. तिथं अनेकांसाठी हातात थंडगार बिअरचा ग्लास बऱ्याचदा दिसतो. अर्थात ती न पिणारे याला अपवाद आहेतच. 

तसं पाहिलं तर वीकेंड (Weekend plans) आणि बिअर (Beer) हे अनेकांसाठी परफेक्ट समीकरण. सारं जग एकिकडे आणि सर्व चिंता दूर लोटत थंड बिअरचा एक एक घोट घेणं एकिकडे असंही म्हणणारे बरेचजण आहेत. ही बातमी त्यांच्यासाठीच. 

तुम्ही कधी कोणत्या दुकानातून बिअर खरेदी केली आहे का? बऱ्याचदा थंडगार खरेदी केलेली बिअरची बाटली घरी किंवा इच्छित स्थळी नेईपर्यंत सर्वसामान्य तापमानावर आलेली असते. पण, यापुढं त्याचीही चिंता मिटणार आहे. कारण, जर्मनीतील एका ब्रँडनं चक्क बिअरची पावडर तयार केली आहे. कंपनीच्या जाव्यानुसार ही जगातील सर्वात पहिली दोन मिनिटांत बिअर तयार करुन देणारी पावडर आहे. Klosterbrauerei Neuzelle या जर्मन मॉनेस्च्री बेस्ड कंपनीकडून ही पावडर तयार करण्यात आली आहे. (beer powder new instant in market by a german company latest Marathi news )

हेही वाचा :  इलेक्ट्रिकनंतर आता बिअरवर चालणार कार? एका बिअरमध्ये 'इतकी' किमी धावणार

 

सध्याच्या घडीला alcohol विरहीत ही बिअर येत्या काळात अल्कोहोलसहित बाजारात आणण्याचा या कंपनीचा मानस आहे. DW या एका एका जर्मन संकेतस्थळानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आणि कंपनीच्या दाव्यानुसारही ही जगातील पहिलीच बिअर पावडर आहे. 

beer powder new instant in market by a german company latest Marathi news

बिअर पावडरचे फायदे काय? 

बिअर पावडर म्हणजे एक कमाल आणि कुतूहलपूर्ण प्रयोगच आहे असं म्हणावं लागेल. सर्वसामान्य बिअरपेक्षा या पावडरचं वजन अतिशय कमी आहे. ज्यामुळं ती एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा खर्चही अतिशय कमी आहे. परिणामी आशिया आणि आफ्रिका खंडात जिथं, वाहतुकीचा खर्च प्रमाणापेक्षा अधिक आहे, तिथं ही बिअर पावडर चांगला व्यवसाय करेल याबाबत उत्पादक कंपनी आशावादी आहे. दरम्यान, अद्यापही ही पावडर बाजारात उपलब्ध नाही, पण यंदाच्या वर्षअखेरीस ती वापरात आणली जाईल अशी चिन्ह आहेत. 

दोन मिनिटांत आतापर्यंत मॅगी (Maggi) तयार होते असाच दावा केला जायचा. पण, आता या मॅगीलाही मागे टाकत दोन मिनिटांत थंडगार पाणी मिसळून चक्क बिअर तयार होतेय. कमालच म्हणावी ना…. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …