‘द कश्मीर फाइल्स’बाबत केलेल्या वक्तव्यावर नदाव लॅपिड यांनी सोडलं मौन

The Kashmir Files: गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)  या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या इस्त्राइल चित्रपट निर्माता  नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. ‘कश्मीर फाईल्स हा प्रोपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे’, असं नदाव यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यामुळे नदाव यांना अनेकांनी ट्रोल केलं. या वक्तव्यामुळे द कश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नदाव यांच्यावर टीका केली. आता नदावनं द कश्मीर फाइल्स चित्रपटावर केलेल्य वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

काय म्हणाले नदाव?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये नदाव म्हणाले, ‘मला माहित होते की ही अशी घटना आहे, जी देशाशी संबंधित आहे. असे विधान करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा ते इस्राइल असल्याची कल्पना मी करत होतो. हे करण्याआधी मी घाबरलो होते तसेच मला अस्वस्थ देखील वाटत होते. हा चित्रपट पाहून मी अस्वस्थ झालो. या विषयांवर कोणीही बोलू इच्छित नाही, म्हणून मला याबाबत बोलावले लागले. कोणीतरी बोलणं गरजेचं होतं. माझ्या भाषणानंतर कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी माझे आभारही मानले.’

हेही वाचा :  श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर झाले भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाले...

नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. सिनोनिम्स (2019), द किंडरगार्डन टीचर (2014) आणि पुलीसमॅन (2011) या चित्रपटांमुळे नदाव लॅपिड यांना विशेष लोकप्रियता मिळाली. यापैकी नदाव लॅपिड यांना द किंडरगार्डन टीचर आणि पुलीसमॅन या चित्रपटांसाठी गोल्डन बेअर आणि कान्स ज्युरी पारितोषिकही मिळाले आहे.

News Reels

 द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं. नदाव लॅपिड  यांनी केलेल्या वक्तव्यावर विवेक यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.  ‘द काश्मीर फाईल्स’चा एक शॉट, एक डायलॉग, एक प्रसंग हा खोटा असं त्यांनी सिद्ध केलं. तर मी चित्रपटांची निर्मिती करणं बंद करेल.’ असं या व्हिडीओच्या माध्यमातून विवेक यांनी सांगितलं. 

द कश्मीर फाइल्स या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या विषयांवर आधारित आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरघोस कमाई केली होती. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Nadav Lapid: ‘द कश्मीर फाईल्स’ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या

हेही वाचा :  Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रेंचा 'सजना' सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …