‘मला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय..’ अखेर आमिर खानला झाली घरच्या नात्याची जाणीव

Aamir Khan on Family Relation: सलमान, आमिर आणि शाहरुख हे 3 खान आपल्या अभिनयाने बॉलिवूड गाजवत आहेत. यातील आमीर खानची ओळख मिस्टर परफेक्शनिस्ट अशी करुन दिली जाते. दर महिन्याला नवा सिनेमा असं न करता, वर्षातून एखादा पण दर्जेदार सिनेमा करण्याकडे आमीरचे लक्ष असते. यामुळे फॅन्सही त्याच्या सिनेमाला थिएटरमध्ये गर्दी करतात. आमिर खानला सर्वजण मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. पण यावर त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया त्याने सांगितली आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत त्याने पर्सनला लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये येणाऱ्या अडचणींवर दिलखुलासपणे भाष्य केले आहे. 

किरण रावचे दिग्दर्शन

आमिर खान ‘लापता लेडीज’ नावाच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावने याचे दिग्दर्शन केले आहे. आमिर खान असाच कोणता मूव्ही साइन करत नाही. त्यामुळे या सिनेमात काय खास असणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. 

किरणने 2010 साली ‘धोबी घाट’ नावाचा सिनेमा बनवला होता. यानंतर ती आझादच्या पालनपोषणात व्यस्त झाली. 2 वर्षापुर्वी तिने पुन्हा काम करायला सुरुवात केली आणि एका चांगल्या कहाणीच्या शोधात होती. या काळात तिने अनेक कहाण्यांवर काम केले. मला तिच्या साऱ्या कहाण्या आवडल्याचे आमिर सांगतो. ती खूप चांगली लेखिका आहे. अनेकदा आम्ही 2-3 कहाण्यांवर एकत्र बसून काम केले पण त्या फिट बसू शकल्या नाहीत, असे त्याने सांगितले. 

हेही वाचा :  EaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका

एका स्क्रिप्ट रायटिंग स्पर्धेसाठी मी परिक्षक बनलो होतो. त्यातील एक स्क्रिप्ट मला आवडली.  या सिनेमाचे राइट्स घेण्यासाठी मला 1-2 वर्षे लागली. माझ्याकडे तुझ्यासाठी एक कहाणी असल्याचे मी किरणला सांगितले. तिने ती वाचली आणि त्यावर काम सुरु झाल्याचे आमिर सांगतो. 

लाईफ बॅलेन्स करणं कठीण

पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलेन्स करणं माझ्यासाठी कठीण असल्याचे आमीर सांगतो. माझं आयुष्य पूर्णपण इम्बॅलेन्स राहिली आहे. तुम्ही लोकं मला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणता तेव्हा माझ्या घरी वेगळी परिस्थिती असते. लोक मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात यावर घरचे सर्व हसतात, असे तो सांगतो. 

तुम्ही कधी माझ्या घरी या तेव्हा तुम्हाला कळेल मी किती परफेक्शनिस्ट आहे ते. मी कोणत्याच अ‍ॅंगलने परफेक्शनिस्ट नाहीय. मी पूर्णपणे कामात झोकून देणारा माणूस आहे, जो आपल्या धुंदीत असतो. अब्सेस माइंडमध्ये असतो. 

आता मला बॅलेन्स्ड राहायला हवं

मी खूप एक्स्ट्रीम लेवलचा माणूस आहे. जे करतोय तेच करतोय आणि दुसरे काही नाही. या सर्वात आयुष्यात ताळमेळ कधी राहिला नसल्याचे त्याने सांगितले. आता इंडस्ट्रीमध्ये 35 वर्षे घालवल्यानंतर मला बॅलेन्स्ड राहायला हवं, असं मला वाटत असल्याचे आमिरने सांगितले. मी माझ्या कामाच्या व्यापात मुलांना वेळ देऊ शकलो नाही. मी माझ्या कहाण्या आणि कॅरेक्टरमध्ये इतका व्यस्त असायचो की आज मला त्याचा पश्चाताप होतोय. आता वाटतं की मुलांना जास्त वेळ द्यायला हवा होता. 2-3 वर्षापुर्वी मला या गोष्टीचे महत्व पटू लागले तेव्हा मी घरी जास्त वेळ देऊ लागलो, असे आमीर खानने मुलाखतीदरम्यान सांगितले.

हेही वाचा :  दोन घटस्फोट, अफेअरच्या चर्चा, अन् बरचं काही; आमिरबद्दलच्या 'या' गोष्टी माहितीयेत?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …