तुमच्या ताटात प्लास्टिकचा भात तर नाही? कसा ओळखाल Original तांदुळ

How to recognise original basmati rice : घरातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीसोबत तुम्ही गप्पागोष्टी करत बसलात, तर त्या गप्पांमध्ये काही गोष्टी सातत्यानं सांगितल्या जातात. एक म्हणजे, काय तुम्ही आजकालची पोरं… आणि दुसरं म्हणजे आमच्या काळात आम्ही सर्वकाही अगदी अस्सल खाल्लं. आता त्यातलं काहीच राहिलेलं नाही. आम्हाला हे ऐकून कंटाळा आलाय असं तुम्ही म्हणालात, तरी ही बाब नाकारता येत नाही. की, आपल्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत भेसळ असते. अगदी पानात वाठढला जाणारा भातही याला अपवाद नाही. 

तुमच्या ताटात वाढला जाणारा भात प्लास्टिकचा नाही? 

हल्लीच्या दिवसांमध्ये असेही तांदुळ पाहायला मिळतात जे शिजवून ताटात जेव्हा भात वाढला जातो, तेव्हा ते प्लास्टिकचे असल्याचं कळतही नाही. पण, हाच अजाणतेपणा तुम्हाला धोक्यात टाकू शकतो. कारण, यामुळं असंख्य आजारपणं ओढावली जाऊ शकतात. तांदुळामध्ये होणारी भेसळ ही तुलनेनं सर्वाधिक प्रमाणात बास्मती प्रकारामध्ये पाहायला मिळते. 

हेही वाचा :  'ज्याने सख्ख्या चुलत्याचा विश्वासघात...'; 105 कोटींचा उल्लेख करत शालिनीताईंची अजित पवारांवर टीका

कसा असतो अस्सल Basmati Rice? 

(Basmati Rice Identification) अस्सल बास्मती तांदळाला असणारा सुगंधच सर्वकाही सांगून जातो. (India) भारत, पाकिस्तान (Pakistan ) आणि नेपाळमध्ये (Nepal) तांदळाच्या या प्रकाराची शेती केली जाते. हा तांदुळ अतिशय सुटसुटीत, चमकदार आणि पारदर्शी असतो.  तो जेव्हा शिजवला जातो तेव्हा त्याचा आकार दुपटीनं वाढतो. कौतुकाची बाब म्हणजे हा तांदुळ शिजवल्यानंतरही चिकटत नाही. उलटपक्षी तो हलका फुलतो. देशभरात या तांदळाला विशेष पसंती मिळते. एखाद्या खास कार्यक्रमाच्या वेळी गोडा भात असो किंवा बिर्याणी (Biryani), बास्मतीलाच अनेकांची पसंती असते. 

एक तंत्र वापरून बना तांदळातील जाणकार… 

चुन्याच्या मदतीनं तांदूळ अस्सल आहे की बनावट याची माहिती करता येऊ शकते. यासाठी तांदळाचे काही दाणे एका भांड्यात घ्या. यामध्ये थोडासा चुना आणि पाणी मिसळून एक मिश्रण तयार करा. आता या मिश्रणात तांदूळ काही वेळ भिजवा आणि तसाच ठेवा. काही क्षणांतच तांदळाचा रंग बदलेल, किंवा तो रंग सोडेल. असं झाल्यास तो तांदुळ बनावट आहे यावर शिक्कामोर्तब होईल. (How Ti identify fake Basmati Rice? )

प्लास्टिकचा तांदुळ अशा प्रकारे ओळखा (Plastic Basmati Rice)

– तांदळाचे काही दाणे आगीवर ठेवा. ते जळत असताना त्यातून येणारा वास हा प्लास्टिक जळतो तयास असेल. असं झाल्यास तांदुळ बनावट असण्याची शक्यता आहे. 
– तांदुळ शिजवताना एखाद्या भांड्याच्या वरील भागावर जाडसर थर तयार झालेला असेल, तर समजा तांदुळ बनावट आहे. 
– गरम तेलात टाकल्यास बनावट तांदुळ लगेचच विरघळतो. 
– पाण्यात तांदळाचे दाणे टाकल्यास ते तरंगतात, तेव्हा समजा हा तांदुळ बनावट आहे. 

हेही वाचा :  "आम्हाला रक्तपात नको होता, अन्यथा...", अमृतपाल सिंगच्या अटकेनंतर CM भगवंत मान स्पष्टच बोलले

(वरील माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारे घेण्यात आलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …