Breaking News

Video : आई शिकली प्रगती झाली, काॅलेजमधल्या थट्टेला काय उत्तर देते अरुंधती?

मुंबई :आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची तारेवरची कसरत सुरू आहे. सकाळी ती तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी काॅलेजला जातेय. तर दुपारनंतर ती संगीत विद्यालयात शिकवतेय. मालिकेच्या पुढच्या भागाचा व्हिडिओ समोर आलाय.

या व्हिडिओत अरुंधती संगीत विद्यालयातल्या विद्यार्थ्यांसमोर बोलतेय. संगीताचं महत्त्व समजावून सांगतेय. दूर उभं राहून आशुतोष आणि सुलेखा ताई हे पाहतायत. सुलेखा ताई आशूला म्हणतात, ती तुझं स्वप्नं पूर्ण करतेय. हे नातं आणखी घट्ट कर.

माधुरी दीक्षितनं वरळीमध्ये ५३ व्या मजल्यावर घेतलं आलिशान घर, Photo पाहून व्हाल थक्क!

त्याच व्हिडिओत आणखी एक सीन आहे. त्यात अरुंधती काॅलेजला जातेय. तिथे काही विद्यार्थी उभे आहेत. तिला पाहून ते म्हणतात, काय काकू. यावर अरुंधती हॅलो म्हणते. मग एक जण तिला म्हणतो, आई शिकली प्रगती झाली. तुम्ही आपल्या वर्गातल्या मुलांसाठी डबे देणार का? अरुंधतीला हा थट्टेचा सूर कळतो. आता ती काय उत्तर देणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

दोन-तीन दिवसाच्या भागात अरुंधती काॅलेजला जायला निघतेय. इकडे देशमुखांच्या घरी नेहमीप्रमाणे अनिरुद्ध काही कडवट बोलतोच. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून सगळे जण अरुंधतीच्या घरी जातात. तिथे यश तिला म्हणतो, आमच्या शाळेचा पहिला दिवस होता, तेव्हा तू आम्हाला सोडायला आली होतीस, आता आम्ही तुला सोडायला येतो.

अरुंधती, अनिरुद्ध, संजना सगळ्यांनीच धरलाय एकत्र फेर, मामला आहे तरी काय?

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीच्या यशाचा आलेख प्रेक्षकांना आवडतोय. अजून बऱ्याच गोष्टी मालिकेत घडायच्या आहेत. प्रेक्षकांना अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न कधी होणार, याचीही उत्सुकता आहे. नुकताच मालिकेचा ८०० वा भाग झाला. त्यावेळी सेटवर पार्टी झाली. मधुराणी प्रभुलकर, अपूर्वा गोरे यांनी गाणी म्हटली. सगळेच कलाकार धमाल करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले.

आता Bigg Boss Marathi 4 च्या गॅलरीत बसून स्पर्धक करणार ‘चाय पे चर्चा’

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next विश्वचषकापूर्वीच्या भारताचे सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, मिशन मेलबर्नमधला पहिला सामना कधी?

Check Also

नवरा बायकोचं प्रेम पुन्हा बहरणार; अश्विनी श्रेयसला प्रेमाची कबुली देणार

मुंबई, 05 ऑक्टोबर :  झी मराठीवरील  ‘तू चाल पुढं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस …

KBC च्या मंचावर लेकाला पाहताच रडले अमिताभ बच्चन; बर्थ डे स्पेशल एपिसोड चर्चेत

मुंबई, 05 ऑक्टोबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. …