Breaking News

रामायणातील सीतेला आवडला नाही आदिपुरुष मधील रावण; म्हणाली….

मुंबई, 05 ऑक्टोबर : सध्या दसरा सण जोरात सुरू आहे. जागोजागी रामलीला सादर केली जात असून राम-रावणाचे युद्ध पारंपरिक पद्धतीने दाखवले जात आहे. महोत्सवाच्या निमित्ताने ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्याने टीझर रिलीज करून खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून रावण आणि हनुमानाच्या पात्रांवरून वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या सिनेमातील रावणाच्या वेषभूषेवरून चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. काल हनुमानाच्या वेषभूषेमुळे भावना दुखावल्याचे आरोप एका खासदाराने केले होते. आता याबद्दल ‘रामायण’ या सुप्रसिद्ध मालिकेतील सीतेने या चित्रपटावर आपले  मत व्यक्त केले आहे.

आदिपुरुष चित्रपट रामायणांवर आधारित असल्याने त्याची तुलना आता रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेशी केली जात आहे. त्यामध्ये अरुण गोविल यांनी रामाची तर  दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली आहे. या भूमिका अजरामर झाल्या आहेत. त्यांनी लोकांच्या मनावर एक  वेगळी छाप सोडली होती. आता आदिपुरुष चा टीझर पाहून लोक या चित्रपटाला रामायण मालिकेशी जोडू पाहत आहेत. सगळीकडून या चित्रपटाला ट्रोली  होत असताना आता सीतेच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे. त्याची आता सगळीकडे चर्चा होतेय.

हेही वाचा – Adipurush : ‘आदिपुरुष’च्या अडचणी वाढल्या; जोरदार ट्रोलिंग नंतर MP च्या मंत्र्यानं केले गंभीर आरोप
अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, ”आदिपुरुष चित्रपटातील रावणाची तुलना अरविंद त्रिवेदीसोबत करणे मला तरी बरे वाटत नाही. एखादे पात्र स्वत:च्या पद्धतीने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे माझे मत आहे. टीझर नुकताच आला आहे, इतक्या लवकर निर्णय घेणे खूप घाईचे असेल. कोणत्याही चित्रपटाचा आशय पाहणे आवश्यक असते, पण जेव्हा रामायण येतो तेव्हा लोकांच्या भावना पाहणेही आवश्यक असते.”

पण एवढे बुलून दीपिका पुढे म्हणाल्या की, ‘लोकांचा विश्वास तिच्याशी निगडित आहे. मी सार्वजनिक ठिकाणी जीन्स घालणे जवळजवळ सोडून दिले आहे, कारण लोक अजूनही माझ्यातील सीतेची पूजा करतात. सैफ अली खानच्या पात्र रावणाची तुलना खिलजीशी केली जात आहे, रावण जर श्रीलंकेचा असेल तर तो तसाच दिसला पाहिजे. पण हा रावण  मुघल नसून मुघलसारखा दिसत आहे. माझ्या मते चित्रपटातील व्यक्तिरेखा पाहणे महत्त्वाचे आहे. टीझरमध्ये फक्त 30 सेकंद पाहिल्यावर मला फार काही समजले नाही, हो तो खूपच वेगळा लूक होता. माझा विश्वास आहे की काळाबरोबर बदल होणे आवश्यक आहे, परंतु प्रेक्षकांच्या विश्वासाशी खेळू नये

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

राज ठाकरेंच्या दमदार आवाजात ‘हर हर महादेव’चा टीझर प्रदर्शित;

मुंबई, 05 ऑक्टोबर : यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. यंदाच्या दिवाळीत जगभरात ‘हर हर …

रेखा यांच्या नवऱ्यानं संपवलं होतं आयुष्य, चिठ्ठीत लिहिलं होतं की, माझ्या संपत्तीतील…

मुंबई: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या नावातच एक वेगळी जादू आहे. त्यांच्या सौंदर्याचे आजही अनेकजण …