शूटिंगच्या शेवटच्या दिवशी श्रेयस-प्रार्थनानं काय केलं? हे क्षण Video मध्ये कैद!
या मालिकेत सानिया चौधरी मुख्य भूमिका साकारत आहे. नाटक, मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. दार उघड बये मालिकेत ती संबळ वादक दाखवली आहे. मंदिरात संबळ वाजवते. तिने या भूमिकेसाठी संबळ वादनाचं आवर्जून प्रशिक्षण घेतलं.
या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल बोलताना सानिया म्हणाली, “ मी मुक्ता ही भूमिका साकारत असून घर सावरण्यासाठी घरूनच चालत आलेली संबळ वाजण्याची कला मी आत्मसात करते. अर्थार्जन करून संबळ वाजवण्याची परंपराही जोपासते. हे एक असं गाव आहे जिथे मुलीच्या हातात संबळ बघणं एक अपशकुन मानलं जातं. फक्त त्या गावात नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच गावांमध्ये अजूनही मुलींनी संबळ वाजवणं चांगलं मानलं जात नाही. अशा गावात एक साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुष प्रधान संस्कृती ह्यांचा लढा या मालिकेत दिसून येणार आहे. प्रेक्षकांसाठी ही मालिका बघणं रोमांचक ठरणार आहे.’
गाण्यापासून खाण्यापर्यंतचा आशा ताईंचा प्रवास…दुबई, कुवेतसह अनेक देशात
दार उघड बये ही नवीन मालिका १९ सप्टेंबरपासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहोचली असेल. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव अशी तगडी कलाकारांची फौज आहे. वादळवाट या मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी शरद पोंक्षे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहेत.
माधुरी समोर डान्स करायला अमृताला वाटतेय भीती
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या