यशराज फिल्मचा ‘मेरे यार की शादी है’ हा पहिलाच हिट सिनेमा दिल्यानंतर ट्युलिपचं करिअर फारसं चाललं नाही. तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. पण ती काय करतेय याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. आज ट्युलिप उद्योजिका बनली असून ६०० कोटींच्या कंपनीची संचालिका आहे. ११ सप्टेंबरला तिचा वाढदिवस (Happy Birthday Tulip Joshi) आहे. त्यामुळेच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
यशराज फिल्मसारखं तगडं बॅनर ट्युलिपला पहिल्याच सिनेमासाठी मिळालं. उदय चोप्रा तिचा या सिनेमात नायक होता. तर जिमी शेरगीलहीची खास भूमिका होती. सिनेमाची कथा आणि यशराजचा प्लसपॉइंट असलेली रोमँटिक गाणी यामुळे हा सिनेमा हिट झाला. ट्युलिपला या एका सिनेमाने स्टार बनवलं, तिचा खास असा चाहतावर्गही झाला. पण या सिनेमानंतर ट्युलिपला पुढे कोणतीही ऑफर आली नाही. त्याला नेमकं काय कारण झालं हे काही कळालं नाही, पण ट्युलिपने बॉलिवूडपासून लांब जायचं ठरवलं.
हे वाचा-शॉर्ट ड्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांंसमोर पोहोचलेली अभिनेत्री; ट्रोल झाल्यावर मागितली माफी
कसा मिळाला होता पहिला सिनेमा?
ट्युलिपला पहिला सिनेमा अचानकच मिळाला होता. आदित्य चोप्राची पहिली बायको पायल खन्ना ही ट्युलिपची मैत्रीण. या मैत्रीतूनच ट्युलिपला मेरे यार की शादी है या सिनेमाची ऑफर आली. गंमत म्हणजे ट्युलिपचं हिंदी फारसं चांगलं नव्हतं. सिनेमासाठी निवड झाल्यानंतर ट्युलिपने हिंदी भाषेचे धडे गिरवले. या सिनेमातून तिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री तर मिळाली पण करिअर चाललं नाही. काही जणांनी तिला तिचं नाव बदलण्याचा सल्लाही दिला होता. त्यानंतर ट्युलिपने अंजली हे नाव घेतलं पण तरीही काहीच फायदा झाला नाही. अखेर २०१५ ला ट्युलिप बॉलिवूडपासून कायमची दूर गेली.
हे वाचा-प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनानंतर हळहळले सिनेविश्व; प्रभासने गमावली जवळची व्यक्ती
बॉलिवूड सोडल्यानंतर ट्युलिपने लग्न केलं. तिचा नवरा कॅप्टन आणि बिझनेसमन विनोद नायर आहे. विनोदसोबत ती लग्नाआधी ५ वर्षे रिलेशनशीपमध्ये होती. विनोद भारतीय सैन्यदलातून निवृत्ती घेऊन उद्योजक बनला. त्याची एक कन्स्टलिंग फर्म आहे. याच कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारी ट्युलिप सांभाळत आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या