५ गोष्टींचा कराल वापर तर त्वरीत कोसळेल कोलेस्ट्रॉल, घरच्या घरी मिळेल उत्तम रिझल्ट

Tips To Control Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोकसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या तरूण वर्गालाही कोलेस्ट्रॉलची समस्या त्रासदायक ठरताना दिसत आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. कोलेस्ट्रॉल हे रक्तातील नसांमध्ये जमा होते आणि त्यामुळे रक्तप्रवाह योग्य राहात नाही. यामुळे तुमच्या जीवाला अधिक धोका निर्माण होतो. पण मग कोलेस्ट्रॉलवर कसे नियंत्रण आणायचे आणि नैसर्गिक पद्धतीने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवता येते का? असा प्रश्न पडतो.

मायोक्लिनिकच्या रिपोर्टनुसार, तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल केल्यास, कोलेस्ट्रॉल बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहू शकते. या बदलांमुळे तुम्ही घेत असलेल्या औषधांचाही योग्य परिणाम शरीरावर होऊ शकेल. कोणते बदल केल्यास मिळेल उत्तम रिझल्ट घ्या जाणून. (फोटो सौजन्य – iStock)

​डाएटमध्ये करा बदल​

​डाएटमध्ये करा बदल​

कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर रेड मीट अथवा सॅच्युरेडेट फॅट्सवाली फळं तुम्ही खाणं टाळावे. जंक फूड्सदेखील खाऊ नयेत. ओमेगा – ३ अ‍ॅसिड आणि सॉल्युबल फायबर असणारे पदार्थ तुम्ही जास्त खावेत. याचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करून घ्यावा. तसंच डेअरी उत्पादन आणि फळं-भाज्यांचा अधिक वापर करावा.

हेही वाचा :  ...तर मी अमेरिकेला निघून जाईन; 'तो' विषय काढताच बच्चू कडू चिडले

​रोज करा व्यायाम​

​रोज करा व्यायाम​

आठवड्यात जास्तीत जास्त दिवस व्यायाम करा आणि आपल्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीकडे अधिक लक्ष द्या. व्यायामामुळे कोलेस्ट्रॉलमध्ये सुधारणा होते. तसंच आठवड्यातून किमान पाच दिवस तरी कमीत कमी ३० मिनिट्स व्यायाम करा. तसंच आठवड्यातून किमान तीन वेळा तरी २० मिनिट्स एरोबिक अ‍ॅक्टिव्हिटीज नक्की करा.

(वाचा – महिलांमध्ये झपाट्याने वाढत आहेत चयापचयचे विकार! रोखण्यासाठी काय करावे आणि काय करू नये)

​धुम्रपान करणे सोडून द्या​

​धुम्रपान करणे सोडून द्या​

धुम्रपान अर्थात स्मोकिंग सोडल्याने HDL अर्थात बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये वेगाने सुधारणा होते. सिगरेट प्यायल्याने ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट वेगाने वाढते. स्मोकिंग सोडल्याने हृदयरोगाचा धोका टळतो. तसंच यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका राहात नाही.

(वाचा – ‘Period Panty’ मासिक पाळीत वापरण्याचं प्रमाण का वाढलंय, कसा करावा वापर जाणून घेणे गरजेचे)

​वजन करा कमी​

​वजन करा कमी​

शरीरातील वजन वाढल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होते. वजन कमी केल्यामुळे तुम्ही अगदी सहजपणाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणू शकता. आपल्या दैनंदिन जीवनात तुम्ही चालणे, जॉगिंग अथवा व्यायाम करण्याची सवय लावल्यास आणि योग्य आहार खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहाते. तसंच लठ्ठपणा असल्यास वेळीच कमी करा.

हेही वाचा :  Viral Video : ...अन् घसाच कोरडा पडला, मोठा मासा पकडण्याच्या नादात गळाला लागला चक्क देवमासा!

(वाचा – डायबिटीसच्या रूग्णांनी व्हाईट ब्रेड खाणे अयोग्य? काय होते नुकसान घ्या जाणून)

​दारूचे सेवन कमी करा​

​दारूचे सेवन कमी करा​

अल्कोहोलचे सेवन कमीत कमी करणे कोलेस्ट्रॉलचा धोका टाळण्यासाठी योग्य आहे. अल्कोहोलचे सेवन अधिक करत असल्यास बॅड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात वाढते. जर तुम्ही दारू पित नसाल तर तुमच्या आरोग्यासाठी हे अधिक चांगले ठरू शकते. दारूमुळे उच्च रक्तदाब, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोकचा धोकाही संभवतो.

कोलेस्ट्रॉल त्वरीत कमी करण्यासाठी या ५ गोष्टींचा तुम्ही अवलंब केलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

टीप – अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला यावर नक्की घ्यावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …