पोटात जाताच हे ४ पदार्थ वाढवतात LDL Cholesterol, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक

कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅक येतो हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे नियमित योग्य डाएट आणि व्यायाम करायला हवा यावर आता तज्ज्ञांकडूनही भर दिला जातो. हल्ली कोलेस्ट्रॉल वाढणं, हृदयविकाराचा कमी वयात झका येणं या समस्या वाढल्या आहेत. तुम्ही जर अनहेल्दी फूड्सवर भर देत असाल तर वेळीच सावध व्हा.

कोलेस्ट्रॉल आपल्या नसांमध्ये तयार होतं. यामुळे रक्तप्रवाह हळू होतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पण असेही काही लिक्विड पदार्थ आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे. जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ. (फोटो सौजन्य – iStock)

​दारूचे प्रमाण ठरते धोकादायक​

​दारूचे प्रमाण ठरते धोकादायक​

Alcohol Causes LDL Cholesterol: heartuk.org.uk ने दिलेल्या अहवालानुसार, जेव्हा तुम्ही दारू पिता, तेव्हा तुमच्या यकृतावर त्याचा परिणाम होतो आणि तुमच्या रक्तात ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्ट्रॉल अधिक वाढू लागते. दारू कमी प्यायल्यास कोलेस्ट्रॉलचा त्रास कमी होतो, तसंच हृदयाच्या आरोग्यातही सुधारणा होते. त्यामुळे दारूचे प्रमाण कमी करा अथवा संपूर्ण बंद करावे.

हेही वाचा :  दुचाकीवरुन जात असताना Silent Heart Attack; 26 वर्षांच्या तरुणाने गमावला जीव

​पाम ऑईलचे सेवन करावे कमी ​

​पाम ऑईलचे सेवन करावे कमी ​

Palm Oil Causes LDL Cholesterol: एका अभ्यासात सिद्ध झाल्यानुसार, पामतेलामध्ये अन्य तेलांच्या तुलनेत अधिक चरबी असते. जर पामतेलाचे नियमित सेवन होत असेल तर रक्तातील कोलेस्ट्रॉल पटकन वाढते. यामुळे धोका अधिक निर्माण होतो. तसंच अन्य तेलांच्या तुलनेत पामतेलात LDL Cholesterol हे ०.२४ mmol/L इतके वाढू शकते.

(वाचा – दुधात भिजवा काजू आणि मिळवा अफलातून फायदे, ऐकाल तर व्हाल हैराण)

​सोडा अथवा सोडा असणारी पेये टाळा​

​सोडा अथवा सोडा असणारी पेये टाळा​

Soda Causes LDL Cholesterol: तुम्हाला कोक, पेप्सी अथवा सोडा बेस्ड असणारी पेये पिण्याची सवय असेल तर वेळीच सोडा. कारण सोडा प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचा त्रास अधिक वाढतो. ज्या वृद्ध व्यक्ती दिवसातून कमीत कमी एक गोड पेय पितात त्यांच्यामध्ये डिस्लिपिडेमिया अर्थात उच्च कोलेस्ट्रॉल विकसित होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकची संभावना असते.

(वाचा – रोज सकाळी भिजवलेले खजूर आरोग्यासाठी ठरतात वरदान, हृदयरोग ते बद्धकोष्ठता आजारांवर गुणकारी)

​फॅटयुक्त दुधाचे जास्त सेवन​

​फॅटयुक्त दुधाचे जास्त सेवन​

Full Fat Milk Causes LDL Cholesterol: हेल्थलाईनने दिलेल्या एका अहवालानुसार, पूर्ण फॅट्स असणाऱ्या दुधाच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक वाढण्याची शक्यता असते. कारण यामध्ये असणारे सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉल त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे साय असणाऱ्या दुधापेक्षा तुम्ही स्किम्ड दुधाचा वापर करावा.

हेही वाचा :  या 8 नैसर्गिक उपायांनी घाणेरडा कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवा, औषधांची गरज ही भासणार नाही

कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी घातक ठरतो. वेळीच तुम्ही या गोष्टी दूर करा आणि आरोग्याची काळजी घेऊन निरोगी राहा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …