अभिनेत्री जेसिका चॅस्टेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

SAG Awards 2023 : लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles)  29 वा स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार सोहळा (SAG Awards 2023) पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री जेसिका चॅस्टेनला (Jessica Chastain) पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अभिनेत्री जेसिकाचा या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

45 वर्षीय जेसिका चॅस्टेन हिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार सोहळ्यासाठी जेसिकानं गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. जेसिकाला ‘जॉर्ज अँड टॅमी’ मालिकेमधील उत्कृष्ट अभिनयासाठी  लिमिटेड सीरिज कॅटेगिरीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार सोहळ्यातील व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार सोहळ्यात ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर जात असताना जेसिकाचा तोल गेला आणि जेसिका पडता-पडता वाचली. एका व्यक्तीनं जेसिकाचा हात धरला. तोल जाण्यामागचे कारण तिच्या ड्रेसमुळे तिचा तोल गेला, असं जेसिकानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं. 

एका मुलाखतीमध्ये जेसिकानं पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. ती म्हणाला की, ‘स्टेजवर जाताना पायऱ्यांवर माझा तोल गेला, त्यामुळे मला लाज वाटली. पण माझी मदत करायला दोन हँडसम व्यक्ती आले. त्यामधील एक पॉल मेस्कल हा होता. माझा ड्रेस पायात अडकल्यानं माझा तोल गेला. पण तेथील व्यक्तींनी माझी मदत केली.’

हेही वाचा :  बॉक्स ऑफिसवरचा बादशाह किंग खान!

पाहा व्हिडीओ

जेसिकानं पुरस्कार सोहळ्यातील तिच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये ती सहकलकारांचे अभार मानताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘SAG च्या मेंबर्सचे मी आभार मानते.’


‘या’ सेलिब्रिटींना मिळाला पुरस्कार 

29 व्या स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार सोहळा हा फेयरमोन्ट सेंच्युरी प्लाजा येथे रविवारी (26 फेब्रुवारी) पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींचा गौरव करण्यात आला. यावेळी  जेमी ली कर्टिस, हुई क्वान, मिशेल योह यांसारख्या कलाकारांना विविध कॅटिगिरीमधील पुरस्कार प्रदान करण्यात आले. एव्हरीवेयर ऑल एट वन्स या चित्रपटानं चार पुरस्कार पटकावले. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

March 2023 Movies Release : मार्च महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बॉक्स ऑफिसवर रणबीर-अजय येणार आमने-सामनेSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …