ही घरगुती ट्रिक वापरली व मेणासारखी वितळून पातळ झाली पोटावरची चरबी, घरीच केलं 22 किलो कमी

लॉकडाऊनमुळे अनेकांचे जीवन बदलले. काही लोकांसाठी हा काळ खूप वाईट गेला तर काहींसाठी तो आयुष्य बदलणारा ठरला. अशीच कहाणी आहे तान्या वार्षणे या मुलीची, जिने लॉकडाऊनच्या अवघ्या 8 महिन्यांत वाढलेलं वजन लक्षणीयरित्या कमी करून स्वत:च्या जीवनाला नवसंजीवनी दिली. तान्याने मार्च 2020 पासून वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला आणि अवघ्या 8 महिन्यांत तिने 22 किलो वजन कमी केले.

हा रिझल्ट मिळवण्यासाठी तिने स्वतःच स्वत:चे डाएट आणि वर्कआउट प्लॅन तयार केला. त्याचा परिणाम पाहिल्यानंतर ती आता हेल्थ ट्रेनर म्हणून देखील काम करते आहे आणि इतर लोकांना वजन कमी करण्यात मदत करते आहे.

नाव – तान्या वार्षणे
शहर – दिल्ली
आधी वजन किती होते – 73 किलो
किती वजन कमी झाले – 22 किलो
वजन कमी करण्यास लागलेला कालावधी – 8 महिने
(Photo Credit: Instagram/tanyavarshney05)

कधी आला टर्निंग पॉईंट

कधी आला टर्निंग पॉईंट

लहानपणापासूनच तान्याचे वजन कमी नव्हते, त्यामुळे वजन कमी करण्याची आपल्याला गरज आहे हे तिला कळत होते, पण तिने ही गोष्ट कधी मनावर घेतली नाही. याच दुर्लक्षपणामुळे हळूहळू लठ्ठपणा वाढत गेला. तिला शारीरिक तंदुरुस्ती कधीच जाणवत नव्हती आणि लवकर थकवा यायचा. ती म्हणाली की, “मी वेटलॉस बाबतीत खूप आळस केला. मला जाणवत होते की वजन कमी करण्याची गरज आहे. पण मी कधीच प्रयत्न केले नाहीत. मात्र जेव्हा लॉकडाऊन आला तेव्हा मला आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पूर्ण वेळ मिळाला.”
(वाचा :- High Uric Acid: औषधं व डॉक्टशिवाय युरिक अ‍ॅसिडचं पार पाणी पाणी करतात हे 3 उपाय, गुडघेदुखी व मुतखडा होईल छुमंतर)​

हेही वाचा :  Crime News: valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच...

असा होता डाएट प्लान

असा होता डाएट प्लान

तान्या म्हणाली की मला सुरुवातीला वेटलॉसबद्दल फारसे ज्ञान नव्हते आणि मी कोणताही विशिष्ट डाएट प्लान फॉलो केला नाही. मी फक्त जंक फूड सोडले आणि घरगुती पदार्थ खायला सुरू केले. हळुहळू मी डाएटविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि मग त्याचरितीने मी अन्न खाऊ लागले. असा होता तान्याचा डाएट!

मॉर्निंग ड्रिंक – आले, हळद, दालचिनी, लिंबू, अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर आणि कोमट पाण्याने बनवलेले पेय
नाश्ता – व्हेजिटेबल अँड पनीर सँडविच
रात्रीचे जेवण – टोफू किंवा पनीर सॅलेड
(वाचा :- बापरे, मुंबईवर H3N2 Virus ची सावली, सर्दी, खोकला, तापाला घेऊ नका हलक्यात, डॉक्टरांचे हे 6 उपायच वाचवू शकतात जीव)​

वर्कआउट आणि फिटनेस सिक्रेट

वर्कआउट आणि फिटनेस सिक्रेट

तान्याने घराजवळील गार्डनमध्ये 15 मिनिटांच्या चालण्यापासून सुरुवात केली. हळूहळू तिने अर्धा तास आणि 1 तास चालून आपली लिमिट वाढवली. यामुळे तिला मोठा फायदा झाला आणि शरीरावर इफेक्ट दिसू लागला. त्यानंतर एक महिन्यानंतर ती रोज 30 ते 40 किलोमीटर सायकल चालवायची. याशिवाय दोरीच्या उड्या, बॉडीवेट ट्रेनिंग, जिम्नॅस्टिक्स इत्यादी देखील करायची. याचाच एकत्रित परिणाम म्हणून तिचे वजन झपाट्याने कमी झाले.

हेही वाचा :  काय आहे 16/8 intermittent fasting Diet Plan? 8 महिन्यात तब्बल 40 किलो वजन घटवलं

(वाचा :- Reduce Blood Sugar : इन्सुलिनने खचाखच भरली आहेत आंब्याची पानं, असा करा वापर, गोड खाऊनही होणारच नाही डायबिटीज)​

स्वत:ला मोटिव्हेट कसं ठेवलं

स्वत:ला मोटिव्हेट कसं ठेवलं

तान्याने सांगितले की, मी वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केल्यानंतर 1-2 महिने माझे वजन कमी झाले नाही. पण तरी मला माझे शरीर खूप हलके आणि एनर्जेटीक वाटू लागले, त्यामुळे मला इथून प्रेरणा मिळत राहिली. मी निश्चय केला होता की आता थांबायचे नाही आणि एक दिवस मला नक्कीच वजनात फरक दिसेल. हळूहळू मी माझा प्रवास आणि प्रयत्न सुरु ठेवले व मला माझ्या वजनात घट दिसू लागली. व अखेर मला हवे होते ते ध्येय मी साध्य केले. शिवाय मी माझी वेटलॉस जर्नी एन्जॉय देखील करू लागली.

(वाचा :- Colorectal Cancer Signs : टॉयलेटमध्ये दिसली ही 6 भयंकर लक्षणं तर सावधान, आतडी अक्षरश: पिळवटून टाकतो हा कॅन्सर)​

लाईफस्टाईलमध्ये काय बदल केले?

लाईफस्टाईलमध्ये काय बदल केले?

जेव्हा मला डाएट आणि न्यूट्रीशनबद्दल थोडेसे ज्ञान मिळाले तेव्हा मी हळूहळू माझा आहार बदलण्यास सुरुवात केली. मी प्रथम माझ्या एका जेवणात हेल्दी फूडचा समावेश केला, स्वत:ला हेल्दी हॅबिट्स लावून घेतल्या. असे करून हळूहळू मी दिवसभरातील सर्व मील हेल्दी बनवले. आहारात मी प्रोटीन फूड आणि भाज्यांचे सेवन वाढवले, तेलाचे सेवन कमी केले, फायबर फूड्सवर जास्तीत जास्त भर दिला जेणेकरून पोट साफ राहावे.
(वाचा :- Rapper Badshah Weight Loss रॅपर-गायक बादशाहला या 4 समस्यांमुळे करावं लागलं वेटलॉस, या आजारात थांबतो थेट श्वासच)​

हेही वाचा :  रोज सकाळी 'हे' खास पाणी पिऊन या डॉक्टराने घटवलं तब्बल 38 किलो वजन, लठ्ठपणामुळे झाला होता असंख्य आजारांचा शिकार..!

वेटलॉसमधून काय शिकवण मिळाली?

वेटलॉसमधून काय शिकवण मिळाली?

तान्या म्हणाली, “माझ्या वजन कमी करण्याच्या मेहनतीमधून मला हे शिकायला मिळालं की, जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार केलात, तर तुमच्याकडे सुविधा असोत किंवा नसोत, तुम्ही ते ध्येय पूर्ण करू शकता. शिवाय, यामुळे माझे टाईम मॅनेजमेंट स्किल्स आणि टास्क कंप्लीशन पॉवर देखील वाढली आहे.”
(वाचा :- H3N2 Virus चिंता वाढली, करोनानंतर एच3एन2 व्हायरसचं थैमान सुरू,झाला 1 मृत्यू, मरण्याआधी दिसली ही 3 भयंकर लक्षणं)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …