६ महिन्यात दोन वेळा जुळ्या मुलांना जन्म, मोमो ट्विन्स म्हणजे नेमके काय

U.S. मधील ब्रिटनी अल्बा या महिलेने मोमो ट्विन्स जन्म दिला आहे. टुस्कालुसामधील अल्बा या एक शाळेतील शिक्षिका असून त्यांनी आधी एकदा जुळ्या बाळांना जन्म दिला आणि त्यानंतर केवळ ६ महिन्याच्या कालावधीत पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला. Birmingham Women And Infant Center च्या University Of Alabama ने यावर पुष्टी दिली.

दोन्ही जुळ्या मुलांची डिलिव्हरी झाल्यानंतर यांना मोमो ट्विन्स असे म्हटले जात आहे. नेमके हे काय प्रकरण आहे आणि मोमो ट्विन्स ही काय संकल्पना आहे अथवा असे कसे घडू शकते याबाबत महत्त्वाची माहिती आम्ही अभ्यासानुसार देत आहोत. (फोटो सोजन्य – iStock)

Momo Twins म्हणजे नेमके काय?

momo-twins-

मोमो ट्विन्स अर्थात मोनोअ‍ॅम्निओटिक मोनोकोरिओनिक ट्विन्सदेखील म्हटलं जातं. हे एकच प्लेसेंटा, अ‍ॅम्निओटिक पिशवी आणि फ्लूईड शेअर करतात. एकाच सिंगल फर्टिलाईज ओवम अथवा अंड्यापासून आयडेंटिकल ट्विन्स होतात तेव्हा याला मोमो ट्विन्स असे म्हटले जाते. या जुळ्या मुलांची एकच प्लेसेंटा आणि अ‍ॅम्निओटिक पिशवी असते.

हेही वाचा :  आतड्यातील विषारी घाण झटक्यात काढून फेकतात हे 5 पदार्थ, गॅस, अपचन, पोट साफ न होणं सर्व समस्यांचा उपाय किचनमध्ये

मोमो ट्विन्स दुर्लभ

मोमो ट्विन्स दुर्लभ

मोमो ट्विन्स हे दुर्लभ असतात आणि UAB Marnix E. Heersink स्कूल ऑफ मेडिसिन प्रसूती आणि स्त्री रोग विभागातील सहाय्यक प्रोफेसर रशेल सिंकीच्या म्हणण्यानुसार, मोमो ट्विन्समध्ये धोका अधिक असतो. अशी घटना फार क्वचित घडते.

(वाचा – प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग का होते? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास, गर्भपाताचा होऊ शकतो त्रास)

काय असतात गुंतागुंत

काय असतात गुंतागुंत

मोमो ट्विन्समध्ये डिलिव्हरी करणे अत्यंत गुंतागुंतीचे ठरते कारण यामध्ये जुळ्या मुलांची अ‍ॅम्बिकल कॉर्ड वेगळी असते बाकी सर्वच गोष्टी एक असतात. त्यामुळे एकाच पिशवीत अ‍ॅम्बिकल कॉर्ड गुंतण्याची शक्यता अधिक असते. असे झाल्यास बाळाला रक्त मिळणे बंद होते आणि अशा परिस्थितीत बाळाचे जगणेही कठीण होते. यामुळेच मोमो ट्विनमध्ये स्टिलबर्थचा धोका अधिक संभवतो.

(वाचा – स्तनपानादरम्यान स्मार्टफोनचा वापर आईला करतोय बाळापासून दूर, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता)

या मुलांची डिलिव्हरी कशी झाली?

या मुलांची डिलिव्हरी कशी झाली?

मोमो ट्विन्समध्ये गुंतागुंत लक्षात घेता ब्रिटनीला युएबी हाय रिस्क ऑब्स्टेस्ट्रिक्स युनिटमध्ये अ‍ॅडमिट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. ब्रिटनीला २४ व्या आठवड्यापासून ते २८ व्या आठवड्याच्या आतच रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले आणि २४ तास तिच्यावर नजर ठेवत तिची काळजी घेण्यात आली. मागच्या वर्षी २५ ऑक्टोबरला तिच्या बाळांचा जन्म झाला.

हेही वाचा :  प्रेग्नंसीमध्ये केस धुणे योग्य आहे का ? डॉक्टरांकडून जाणून घ्या उत्तर

(वाचा – एडिमामुळे प्रेग्नन्सीमध्ये स्तन आणि हातांवर येऊ शकते सूज, एडिमा म्हणजे नेमके काय)

कितव्या आठवड्यात झाली डिलिव्हरी

कितव्या आठवड्यात झाली डिलिव्हरी

ब्रिटनीची डिलिव्हरी ही ३२ व्या आठवड्यात करण्यात आली आणि बाळांना न्यूबॉर्न केअरमध्ये ठेवण्यात आले. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, मोनोअ‍ॅम्निओटिक ट्विन प्रेग्नन्सी ही दुर्मिळ आहे. मात्र अशी गर्भधारणा असेल तर त्याचे निदान आधी व्हायला हवे. कारण गर्भधारणेत गुंतागुंत ही अधिक प्रमाणात घडते. या केसमध्ये केवळ ७० टक्केच जिवंत राहू शकतात.

यावर काय करता येते?

यावर काय करता येते?

NCBI नुसार, गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीमध्ये Early Anatomy Screening चा सल्ला देण्यात येतो. मोमो ट्विन प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या मृत्यूची अन्य कारणेही असतात, यामध्ये ट्विन – ट्विन ट्रान्सफ्युजन सिंड्रोम, टाईट कॉर्ड अँटँग्लमेंट अथवा Acute Hemodynamic Anastomoses द्वारे तीव्र हेमोडायनॅमिक असंतुलचा समावेश होते. याबाबत कळल्यानंतर बाळाकडे लक्ष ठेवावे लागते. तेव्हाच बाळ जगू शकते. कोणतीही गुंतागुंत दिसत नसल्यास, ३३ ते ३४ व्या आठवड्यात बाळाचा जन्म करता येतो.

हे आर्टिकल हिंदीत वाचा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …