मॅट लिपस्टिक ओठांवरून निघता निघत नसेल तर वापरा सोप्या टिप्स, ओठ पडणार नाहीत काळे

ओठांना लिपस्टिक लावल्यानंतर लुकमध्ये एक वेगळाच चार्म येतो. इतर मेकअप करत बसण्यापेक्षा अनेक महिला केवळ लिपस्टिक लावण्याला पसंती देतात. त्यातही ग्लॉसी, शिमरी अथवा अन्य लिपस्टिकपेक्षा मॅट लिपस्टिकला अधिक मागणी असते. ही लिपस्टिक ओठांवर अधिक काळ टिकते. पण मॅट लिपस्टिक काढताना मात्र महिलांना काही ब्रँड्सच्या बाबतीत खूपच त्रास होतो आणि ओठ काळे पडण्याचीही भीती असते. मग अशावेळी नक्की काय करावे आणि कसा त्रास होणार नाही याच्या काही सोप्या टिप्स. हा घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे ओठ नैसर्गिक सुंदर ठेवण्यास मदत करू शकता. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​नारळाचे तेल सोपा उपाय ​

​नारळाचे तेल सोपा उपाय ​

Coconut Oil For Lipstick Remover: प्रत्येकाच्या घरात नारळाचे तेल हे असतंच. तुम्हाला मेकअप रिमूव्हल मिळत नसेल तर नारळाचे तेल हा सोपा उपाय आहे. मॅट लिपस्टिक ओठांवरून काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरदेखील कधी कधी अपयशी ठरते. पण यावर नारळाचे तेल अधिक गुणकारी ठरते. कापसावर नारळाचे तेल घ्या आणि मॅट लिपस्टिक ओठांवरून काढा. हे कोणताही त्रास न घेता पटकन लिपस्टिक काढण्यास फायदेशीर ठरते आणि त्याशिवाय नारळाच्या तेलाने ओठांना पोषणही मिळते.

हेही वाचा :  PM नरेंद्र मोदी भेटीनंतर एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; म्हणाले "मी मोदींचा चाहता, लवकरच भारतात Tesla...."

​क्रिमी लिप बाम​

​क्रिमी लिप बाम​

Creamy Lip Balm For Lipstick Remover: मॅट लिपस्टिक काढण्यासाठी तुम्ही ओठांवर कोणत्याही पद्धतीचा क्रिमी लिप बाम लावू शकता. इतकंच नाही तर तुम्ही ब्रँडेड मॉईस्चराईजरचा वापर करूनही ही लिपस्टिक काढू शकता. हे क्रिमी लिप बाम लावा आणि मग मुलायम कपड्याने हलक्या हाताने ओठ पुसा. ओठांवरील लिपस्टिक पटकन निघून जाण्यास मदत मिळते.

(वाचा – डॅमेज केसांसाठी रामबाण उपाय ठरतो किचनमधील हा पदार्थ, असा करा वापर मिळतील चमकदार केस)

​टूथब्रशची घ्या मदत​

​टूथब्रशची घ्या मदत​

Toothbrush For Lipstick Remover: ओठांवरून लिपस्टिक काढल्यानंतरही बरेचदा मॅट लिपस्टिकचे डाग ओठांवर राहिलेले दिसून येतात. हे डाग काढण्यासाठी तुम्ही टूथब्रशची मदत घेऊ शकता. सॉफ्ट टूथब्रशच्या सहाय्याने तुम्ही हे डाग स्वच्छ करा. म्हणजे ओठ काळे पडणार नाहीत. तसंच टूथब्रशचा वापर केल्याने ओठ एक्सफोलिएटही होतात. हे करून झाल्यावर तुम्ही ओठांना हायड्रेटेड लिप बाम नक्की लावा.

(वाचा – Fact Check: कांद्याच्या रसाने टक्कल पडणे होते दूर? काय आहे सत्यता जाणून घ्या)

​मॅट लिपस्टिकपूर्वी लावा लिप बाम​

​मॅट लिपस्टिकपूर्वी लावा लिप बाम​

Lip Balm Use Before Lipstick: तुमची मॅट लिपस्टिक अधिक काळ टिकणारी असेल आणि लवकर निघत नसेल तर अशी शेड लावण्यापूर्वी तुम्ही ओठांना लिप बाम लावणे गरजेचे आहे. असे केल्याने ओठ मुलायम राहतील आणि लिपस्टिक काढतानाही त्रास होणार नाही. तसंच रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढणे अधिक गरजेचे असते. यासाठी तुम्हाला ओठ रगडावे लागणार नाहीत.

हेही वाचा :  वयाच्या ४० शीनंतर IVF शिवाय आई होणं शक्य आहे? नॅचरल कन्सिव होण्याची शक्यती किती

(वाचा – चेहऱ्याच्या लटकत्या त्वचेवर लावा हे तेल, ठरेल वरदान आणि येईल अधिक चमकदारपणा)

​ऑलिव्ह ऑईलही ठरते उपयोगी​

​ऑलिव्ह ऑईलही ठरते उपयोगी​

Olive Oil For Lipstick Remover: नारळाच्या तेलाप्रमाणेच तुम्ही ऑलिव्ह ऑईलचाही उपयोग करून घेऊ शकता. नैसर्गिक तेल असल्याने तुमचे ओठ काळे पडणार नाहीत आणि मॅट लिपस्टिक लवकर निघण्यास याची मदत मिळेल.

लिपस्टिक घालविण्यासाठी ओठ रगडणे योग्य नाही. ओठांना यामुळे नुकसान पोहचू शकते. त्यामुळे वर दिलेले उपाय अधिक सोपे आहेत ते वापरावेत.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …