तंजानियाचा किली पॉल भारतात दाखवणार डान्सचा तडका, झलक दिखला जा शोमध्ये थिरकरणार

मुंबई- गेल्या काही वर्षात सोशल मीडियाने अनेकांना लोकप्रियता दिली. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ, रिल्स बनवून प्रसिद्ध झालेले कलाकार काही कमी नाहीत. तांजानियाच्या एका ग्रामीण भागात राहणारा किली पॉल नावाचा तरुण बॉलिवूड गाण्यांच्या प्रेमात पडला आणि त्याने हिंदी गाण्यावर रिल्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर केले. किलीचा लूक, त्याच्या लिप्सिंगची स्टाइल आणि साधेपणा नेटकऱ्यांना इतका आवडला की त्याचे सध्या २.५ मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत. आता त्याच्या भारतीय चाहत्यांना फक्त सोशल मीडियावरच भेटणारा किली पॉल भारतात झलक दाखवण्यासाठी येणार आहे.


छोट्या पडद्यावरील झलक दिखला जा या शोच्या दहाव्या सीझनची सध्या जोरदार हवा सुरू आहे. माधुरी दीक्षित, नोरा फतेह आणि करण जोहर या शोचे परीक्षक आहेत. त्यांच्यासमोर डान्सचा जलवा दाखवण्यासाठी स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स देतात. आता यामध्ये एक नवा कलाकार येणार आहे आणि तोच आहे किली पॉल. किली पॉलला झलकच्या मंचावर डान्स करण्याची संधी मिळाली आहे तर त्याला डान्स करताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे.


कोण आहे किली?

तांजानियाच्या छोट्याशा खेड्यात किली पॉल राहतो. त्याच्या गावात वीजही नाही, पण व्हिडिओ बनवण्यासाठी तो शेजारच्या गावात जातो. २६ वर्षाचा किली बहीण निमासोबत अनेक व्हिडिओ करत असतो. त्याला हिंदी भाषा येत नाही, पण बॉलिवूडमधील हिंदी गाण्यावर लिप्सिंग करत त्याने केलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनेकदा तो त्याच्या खास अंदाजात डान्सही करतो.


किली हा भारतीय सिंगर जुबिन नौटियाचा खूप मोठा फॅन आहे. तर हिंदी भाषा कळली नाही तरी शब्द आणि चाल समजून घेत तो रिल्स बनवतो. किलीने बनवलेला ये राता लंबिया लंबिया रे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. आता किली झलक दिखला जा या शोमध्ये डान्स सादर करून त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करणार आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Zee Marathi वर पुन्हा नवी मालिका; चक्क प्रेक्षकांनी दाखवली उत्सुकता

मुंबई, 08 ऑक्टोबर : मागच्या काही महिन्यांपासून झी मराठीवर सातत्यानं नव्या मालिकांचा सिलसिला सुरू आहे. …

शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्सचं पुढे काय झालं? अभिनेत्रीचं उत्तर ऐकून बसेल धक्का

मुंबई, 08 ऑक्टोबर : सध्या टेलिव्हिजनवर एकाच शोची चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस. मराठी …