Tag Archives: zee 24 taas

तुमच्यावर ही वेळ आणणाऱ्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या- राज ठाकरे

Marathwada Muktisangram: तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दिवसेंदिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असे ते म्हणाले.  फक्त …

Read More »

तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या ‘या’ नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये

RBI Home Loan Rule: घर खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक गृहकर्जाची मदत घेतात. गेल्या वर्षी व्याजदरात सातत्याने वाढ झाल्याने बहुतांश गृहकर्जांचा कालावधी वाढला आहे. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम इतकी मोठी असते की त्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत कर्जाची परतफेड करावी लागते. व्याजदर वाढतात कर्जदारांचा वाढता समान मासिक हप्ता (EMIs) कमी व्हावा यासाठी बॅंकांकडून कर्जाचा कालावधी वाढवला जातो. जास्त व्याजामुळे कर्जदारांना त्रास दिला …

Read More »

अरे वा! ‘येथे’ सापडली ‘पांढऱ्या सोन्याची खाण’, संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती….

Lithium treasure trove usa: जगातल्या प्रत्येक देशात कुठे ना कुठे खनिजांचा साठा आढळत असतो. उत्खनन करताना अशा गोष्टी सापडतात, ज्यांचा कधी विचारही केलेला नसतो. आणि त्याचे बाजारमूल्य हे किंमतीत मोजणेही कठीण असते. अनेक देशांत अशा घटना समोर येतात, अशाच एका घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला ‘पांढरे सोने’ …

Read More »

लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण?

Who Is Saurabh Chandrakar:देशात अनेक  घोटाळे समोर येत असतात. त्यात घोटाळेबाजांनी कोट्यावधींची उड्डाणे घेतलेली असतात. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी सट्टेबाजीचे रॅकेट समोर आले आहे.  ‘महादेव बुक’ अ‍ॅप या नावाने लाखो करोडो रुपयांची सट्टेबाजी चालायची असे ईडीच्या निदर्शनास आले आहे.  या संदर्भात आतापर्यंत सौरभ चंद्राकरची 417 कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर …

Read More »

भारताचे असेही एक इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी बनलेयत प्रेरणा

National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम …

Read More »

RBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार …

Read More »

भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही

Srikant Jichkar: एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो? किती विद्यापिठात शिकू शकतो? यावर आपलं उत्तर 1 ते 10 आकड्यापर्यंत असू शकते. पण असा मराठी माणूस आहे, जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले …

Read More »

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

प्रवीण तांडेलकर, झी मीडिया, भंडारा : बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? …

Read More »

Hindi Diwas:हिंदी आपली राष्ट्रभाषा? खूप झाले वाद, आज जाणूनच घ्या, महात्मा गांधींशी आहे कनेक्शन

Hindi Diwas History: मराठी ही आई तर हिंदी ही मावशी असं आपण संबोधतो. या दोन्ही भाषा एकमेंकाच्या हातात हात घालून चालत असतात. असे असताना इंग्रजीच्या वाढत्या प्रवाभाचा दोन्ही भाषांवर परिणाम झाल्याचे दिसते. दरम्यान हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे विधान आपल्याकडे अधूनमधून ऐकायला मिळते. पण हिंदी खरंच आपली राष्ट्रभाषा आहे का? हिंदी दिवसाचा इतिहास काय आहे? हे सर्वकाही जाणून घेऊया. देशभरात दरवर्षी …

Read More »

‘राष्ट्रवादीचे असले तरी अजित पवार…’ शिंदे, फडणवीसांबद्दल काय म्हणाले संभाजी भिडे

Sambhaji Bhide On Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत. जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या जातील पण त्यांनी उपोषण सोडावे असा निर्णय सर्व पक्षीय बैठकीत झाला. हा संदेश घेऊन मंत्री संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर मनोज जरांगेंच्या भेटीला गेले. दरम्यान शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांची उपोषणस्थळी एन्ट्री झाली आणि एक वेगळेच वातावरण पाहायला …

Read More »

ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा चहा होणार ‘कडू’!, साखर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार?

Sugar Price: आता नागरिकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा चहा ‘कडू’ होण्याची शक्यता आहे. टॉमेटोचे दर महागल्यानंतर आता साखर आपला रंग दाखवणार आहे. लवकरच साखर देखील महागणार असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्पादनात घट झाल्यानं साखरेचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमी …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर बसमध्ये महिलेला प्रसूती वेदना, रस्त्यावर खड्डेच खड्डे; पुढे काय झालं? जाणून घ्या

Woman Labour Pain In Bus Travelling: मुंबई महामार्ग हा गेल्या काही वर्षांपासून राजकीय अनास्था आणि खड्ड्यांमुळे चर्चेत असतो. या नेते मंडळींनी दुर्लक्ष केल्याने या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतोय. विशेषत: आजारी, गरोदर स्त्रियांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रसंग नुकताच मुंबई गोवा महामार्गावर घडला. येथे बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक प्रसूती …

Read More »

शेअर मार्केटची जास्त माहिती नाही पण चांगले रिटर्न्स हवेयत? ‘अशी’ करा गुंतवणूक

Share Market: अनेकांना शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती नसते. पण त्यांना त्यात गुंतवणूक करुन चांगले रिटर्न्स हवे असतात. शेअर बाजारात गुंतवणूकीकडे तुम्ही दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग म्हणून पाहू शकता. फक्त शेअर मार्केटमधून कमाई करून मोठा फंड तयार करणारे अनेकजण आहेत.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. डिमॅट खाते उघडा गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असायला हवे. …

Read More »

शासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; तब्बल 85 संवर्गातील रिक्त पदे भरणार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या गोष्टीची वाट पाहिली जात होती तो शासकीय कंञाटी भर्तीचा जीआर अखेर निघाला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील शासकीय पदं ही कंञाटी कंपन्यांमार्फत थेट भरली जाणार आहेत.  तब्बल 138 संवर्गातील हजारो शासकीय पदं यापुढे थेट कंञाटीपद्धतीनेच भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.शिपाई ते इंजिनीअरची विविध …

Read More »

भारतात डिजिटल रुपयाची होणार सुरुवात? सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या

RBI Digital Rupee: भारतात जी 20 परिषद सुरु असून यामध्ये जगभरातील दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. यावेळी भारतातील प्रमुख पदांवर देशातील महत्वाचे बदल जगासमोर ठेवत आहेत. यूपीआयचा वापर हा एक त्यातीलच एक भाग आहे. असे असताना आता भारतात डिजिटल रुपया म्हणजेत ई रुपया येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाला पार्श्वभूमीदेखील तशीच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भारत …

Read More »

आदित्य L1 आता सुर्याच्या किती जवळ? समोर आली महत्वाची अपडेट

Aditya L 1 Mission Latest Update: इस्रोने पाठवलेले आदित्य एल 1 हळूहळू पृथ्वीपासून दूर आणि सुर्याच्या जवळ पोहोचत आहे. इस्रोकडून यासंदर्भात वेळोवेळी अपडेट देण्यात येते. समोर आलेल्या माहितीनुसार आदित्य एल 1 ने यशस्वीपणे तिसरी उडी घेतली आहे. आता ते 296 किमीच्या वर्तुळात 71767 किमी वेगाने फिरत आहे.  याआधी 5 सप्टेंबर रोजी आदित्य एल 1 दुसऱ्या उडीत 282 किमी x 40225 …

Read More »

Kopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन

Kopardi Rape And Murder Case: कोपर्डी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे सात वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या  करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभर मोठा आक्रोश करण्यात आला. राज्यभरात मोर्चे निघाले होते. त्यानंतर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.  जितेंद्र शिंदे …

Read More »

MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार

MPSC PSI Bharti 2023: एमपीएससी आणि पोलीस भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत बारावी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार ते 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.  महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा …

Read More »

G20 मध्ये पंतप्रधानांसमोर ‘BHARAT’;ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?

BHARAT Vs INDIA:  भारताच्या अध्यक्षतेखाली होणारी  G20 परिषद नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने याची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला. जी 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असलेल्या नावाच्या पाटीवर देशाचं नाव ‘भारत’ असं लिहीलंय. देशाच्या नावातला इंडिया हा उल्लेख वगळून भारत उल्लेख करण्याची सध्या चर्चा रंगली आहे. जी …

Read More »

चंद्रबाबू नायडूंना अटक; 371 कोटींचा स्किल डेव्हलपमेंट स्कॅम काय आहे?

Skill Development Scam: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. स्किल डेव्हलपमेंट घोटाळ्यासंदर्भात ही अटक केल्याचे सांगितले जात आहे. हा घोटाळा एकूण 371 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.  तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू यांना अटक झाली तेव्हा ते नंदल्यातील रॅलीनंतर आपल्या …

Read More »