वाचा: Jio चा ‘हा’ प्लान Airtel-Vi पेक्षा वरचढ, कमी किमतीत ८४ दिवसांची व्हॅलिडिटी,भरपूर डेटा, २० % कॅशबॅकसह ‘हे’ बेनिफिट्स
या युक्तीने तुम्ही तुमचा मोबाईल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बदलू शकता. तुम्ही कुठेही राहत असाल तरीही, तुम्ही संपूर्ण घरावर लक्ष ठेवू शकता. जर तुमचे बजेट तुम्हाला घरी कॅमेरा बसवण्यात अडचण निर्माण करत असेल. तर, तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त एका जुन्या मोबाईलची गरज आहे. जर तुमच्या घरी वापरात नसलेला एखादी जुना फोन असेल तर तुमचे काम लगेच होईल. पण, फोन खूप जुना नसावा, तो व्यवस्थित असावा. म्हणजेच, जर त्याचा कॅमेरा इत्यादी सर्व नीट काम करत असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. एका भन्नाट ट्रिकच्या मदतीने तुम्ही मोबाईल तुम्ही सीसीटीव्हीसाठी वापरू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या घरात असे स्थान शोधावे लागेल, जिथून तुमच्या घराचा संपूर्ण किंवा बहुतांश भाग दिसत असेल. यानंतर, तुम्हाला फक्त हा मोबाईल फोन त्या ठिकाणी कॅमेरासह चालू ठेवावा लागेल. फोन Wi-Fiशी कनेक्ट केलेला असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त काही अॅप्स डाउनलोड करावे लागतील. सध्या असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. जे, तुमच्या फोनला सीसीटीव्ही बनवण्याची परवानगी देतात. तुम्ही त्यांचा वापर करू शकता. याशिवाय, हे अॅप्स तुम्हाला अनेक सुविधा देखील देतात. या Apps च्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत रिअल-टाइम लोकेशन शेअर करू शकता.
वाचा: Valentine’s Day ला पार्टनरला गिफ्ट करा ‘हे’ ट्रेंडी गॅजेट्स, किंमत ५,००० पेक्षाही कमी, पाहा लिस्ट
वाचा: ड्युअल रियर कॅमेरासह Samsung Galaxy Tab S8, Tab S8+ आणि Tab S8 Ultra लाँच, पाहा किंमत फीचर्स
वाचा: फक्त या ६ टिप्स फॉलो करा, तुम्ही कधीच ऑनलाइन फ्रॉडला बळी पडणार नाहीत