Tag Archives: Marathi News

भारताची एअर ॲम्ब्युलन्स वापरू न दिल्याने मुलाचा मृत्यू; मुइज्जूंनी दिली नाही परवानगी

Maldives President Muizzu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेवरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्यास भारतीयांनी सुरुवात केली आहे. दुसरीकडे कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं होतं. आता या सगळ्या …

Read More »

चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 22 जानेवारीला होणाऱ्या एकूण 14 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा दिनांक 31 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून याची …

Read More »

चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का?

What are the best times to drink tea News In Martahi : आपल्या आयुष्यातील चहा हा एक महत्त्वाचा घटक आहे. अनेकांना सकाळी चहा प्यायला आवडतो तर काहींना संध्याकाळी एक कप चहा प्यायला आवडतो. पण काही लोक असे असतात जे दिवसभर पण चहा पिऊ शकतात. सुमारे 69 टक्के भारतीय त्यांच्या दिवसाची सुरुवात दूध आणि साखरेचा चहा पिऊन करतात. दिवसाची सुरुवात लोक …

Read More »

मनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा

Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा वातावरण तापणार आहे अशी चिन्ह दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी सरकाला वेठीस धरण्यासाठी मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सरकारला वेठीस धरताना त्यांनी आंतरवाली सराटीमधूनच आमरण …

Read More »

रोहित पवारांना ईडीची नोटीस; शरद पवार म्हणाले, ‘सहा महिने तुरुंगात…’

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी नोटीस पाठवली आहे. ईडीने आमदार रोहित पवार यांना 24 तारखेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. रोहित पवार यांच्यासह मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. सत्ताधारी भाजपवर विरोधी पक्षांकडून सातत्याने हल्लाबोल केला जात असताना आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप …

Read More »

फ्रिज, एसी, सोफा अन्… मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी ‘व्हॅनिटी व्हॅन’

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : मराठा समाजाच्या लोकांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना येत्या 20 जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघणार आहोत. 26 जानेवारीला आमचा मार्चा मुंबईत धडकेल. शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण …

Read More »

रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video

Canada Cold Video : इथं भारतात यंदाच्या वर्षी अपेक्षित हिवाळा जाणवलाच नाही, असं म्हटलं जात असतानाच जगाच्या एका भागात मात्र आलेल्या हिमवादळानं संपूर्ण देशच थांबवल्याची दृश्य समोर आली आहेत. जास्त थंडी म्हणजे नेमकी किती थंडी? हाडं किंवा रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? दाकखिळी बसते म्हणजे नेमकं काय होतं? या प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास तुम्ही कॅनडातील सद्यस्थितीची दृश्य पाहू शकता. …

Read More »

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

Ram Mandir Ayodhya : ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 …

Read More »

पंतप्रधान मोदींचा महिन्याभरात दुसरा महाराष्ट्र दौरा; देशातल्या सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे आज लोकार्पण

प्रताप नाईक, झी मीडिया, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूच्या लोकार्पण केले होते. तसेच नाशिक येथे युवा महोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सोलापूरमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबत अमृत योजनेंतर्गत इतर दोन हजार कोटी …

Read More »

अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठेची घाई का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ आला आहे. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे देशातील 4 पिठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने आताच प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नसल्याची भूमिका शंकराचार्यांनी मांडली आहे. ही पूजा धर्म शास्त्राच्या …

Read More »

असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी!

Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये …

Read More »

एकत्र जळल्या 2 भावांच्या चिता! लोकं अश्रू ढाळत म्हणाले, ‘हे तर कलियुगातील राम-लक्ष्मण!’

Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि  तुमचे डोळे पाणावतील.  वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी …

Read More »

‘अचानक भारत सुंदर दिसायला लागला’; MamaEarth च्या सहसंस्थापकांवर भडकले नेटकरी

MamaEarth Ghazal Alagh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन भारत आणि मालदीवमध्ये संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुन केलेल्या टीकेवरुन मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरुन हटवण्यात देखील आलं होतं. त्यामुळे आता भारतीयांनी मालदीवला आणि तिथल्या पर्यटनाला विरोध सुरु केला आहे. दुसरीकडे भारताल्या नेतेमंडळींपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना भारतीय पर्यटनाला महत्त्व देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता मालदीवला विरोध करण्याच्या नादात मामाअर्थच्या …

Read More »

कॉंग्रेसला खिंडार पाडण्याच्या तयारी! भाजपकडून ऑफर आल्याचा ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

Congress Leader Sushilkumar Shinde: कॉंग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपुर्वीच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता भाजपकडून कॉंग्रेसला खिंडार पाडण्याची तयारी सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. आपल्याला भाजपकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट खुद्द काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.  अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी …

Read More »

ईशा अंबानींनी घेतला व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय; मुकेश अंबानींनाही वाटेल अभिमान

Mukesh Ambani Isha Ambani : (Reliance ) रिलायन्स उद्योग समुहानं व्यवसाय क्षेत्रात एक उंची गाठलेली असतानाच आता मुकेश अंबानी हे त्यांच्या पुढच्या पिढीला या क्षेत्रातील प्रगतीपथावर चालण्यासाठी तयार करताना दिसत आहेत. अंबानी यांची मुलं, अनंत आणि आकाश अंबानी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. त्यात अंबानी यांची लेक, ईशासुद्धा मागे नाही.  ईशा अंबानीच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणाऱ्या आणि 1860000 कोटी रुपयांची …

Read More »

पुण्यात बहिणीची छेड काढली म्हणून भावानं गुंडाला संपवलं; CCTV मुळं घटना उघडकीस

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : (Pune News) पुण्यात आणखी एका गुंडाला संपवल्याची घटना घडली असून, या घटनेमुळं आता पुन्हा एकदा गुन्हेगारी जगताचा सुळसुळाट असणाऱ्या पुण्यानं अनेकांनाच धडकी भरवली आहे. पुण्यातील लष्कर परिसरात नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे आणि ऐवज लुटणाऱ्या एका सराईत गुंडाला बहिणीची छेड काढल्यामुळं तरुणीच्या भावानं दोन मित्रांच्या साथीनं त्याचा खात्मा केला. CCTV मुळं ही संपूर्ण घटना …

Read More »

बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, ‘हा’ जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

Beer belly fat : अधिक प्रमाणात दारूचं सेवन शरिरासाठी घातक ठरतं. त्यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर दारूचं अतिसेवन जीवावर देखील बेतू शकतं. दारूचे विविध प्रकार आहे. दारूचे प्रकार पेयात असलेल्या अल्कोहॉलच्या प्रमाणावर अवलंबून असते. जसं अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते. बिअर बेली म्हणजे काय? बिअर प्यायल्यानंतर अनेकांना …

Read More »

‘कमी शिकलोय म्हणून जास्त कमवतोय, कॉर्पोरेटमध्ये असतो तर…’; डोसा विक्रेत्याने शून्य मिनिटात केला अपमान

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ निव्वळ टाईमपाससाठी असतात तर काही थोड्या वेळासाठी हसवणारे. काही व्हिडीओ हे जुन्या आठवणींना उजाळा देतात तर काही व्हिडीओ हे प्रेरणादायी असतात. व्हायरल व्हिडीओंमध्ये असेही काही व्हिडीओ असतात जे कधीकधी आपण आयुष्यात काहीच केलं नाही अशी भावना देखील मनात आणतात. आठ नऊ तास ऑफिसमध्ये मेहनत करुन मनासारखे पैसे …

Read More »

आई-वडिलांसह भावाला संपवून अपघाताचा बनाव रचला, तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं, कारण होतं…

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक ते डिग्रसवाणी रस्त्यावरील वळणावरील एका खड्ड्यात  11 जानेवारी 2024 रोजी दुचाकीसह तिघांचे मृतदेह आढळून आले होते. सुरुवातीला दुचाकीला अपघात (Accident) होऊन तिघांचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिघंही डिग्रसवाणी इथं राहाणारे असून पती पत्नी आणि मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.. आकाश कुंडलिक जाधव (वय 28) असं मृत मुलाचं नाव …

Read More »