Tag Archives: ताज्या बातम्या

नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?

Narayan Rane Vs Vinayak Raut: राज्यातील एकएका लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटतोय. पण कोकणातील तिढा सुटायला फारच वेळ लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतर हे इच्छुक होते. पण महायुतीने भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या बाजुने कौल दिला. आणि किरण सामंत यांना आपली तलवार म्यान करावी लागली. महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत …

Read More »

प्रेग्नेंट बायकोसाठी 1 महिन्यापासून कॉन्स्टेबल मागत होता सुट्टी! आई-बाळाच्या मृत्यूनंतर मिळाली

Constable leave: अनेकदा कर्मचारी आपल्या बॉसकडे घरगुती गंभीर कारणासाठी सुट्टी मागतात. पण काही कारणामुळे ती मिळत नाही. याचा काय परिणाम होऊ शकतो, हा अंदाज न लावलेला बरा. उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील रामपुरा ठाण्याच्या प्रभारीने मनमानी केल्याने एका शिपायाल सुट्टी मिळाली नाही. प्रेग्नेंट पत्नीवर उपचारासाठी हा शिपाई 1 महिन्यापासून सुट्टी मागत होता. पण त्याला सुट्टी काही दिली जात नव्हती. दरम्यान उपचारादरम्यान …

Read More »

घर चालवायला नव्हते पैसे; दागिने विकून घेतली गाय, नमिता बनल्या करोडपती!

Namita Patjoshi Inspirational Story: यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींना संघर्ष चुकला नाही. आज ज्यांच्या यशाच्या कहाण्या कौतुकाने सांगितल्या जातात, ते संघर्षमयी आयुष्याला तितक्याच जिद्दीने भिडले आहेत, हे खूप कमी जणांना माहिती असते. नमिता पतजोशी यापैकीच एक आहेत.  अनेक अडचणी आल्या पण त्यांनी धैर्य ठेवले. मेहनत घेतली, सातत्य ठेवले. यातून यशाचा मार्ग तयार होत गेला. नमिता या मुळच्या ओडिशाच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचा विवाह …

Read More »

India Missile: अग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांमध्ये कसे झाले बदल?

India Missile: भारत क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तूंग भरारी घेत आहे. शत्रुचा हल्ला परतवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो.  क्षेपणास्त्रे ही स्व-चालित उडणारी शस्त्रे आहेत जी उच्च गतीने आणि अचूकतेने स्फोटक शस्त्रांचा मारा करण्यासाठी, त्यांचे वहन करण्यासाठी डिझाइन केलेली असतात.भारताकडे विविध प्रकारची क्षेपणास्रे आहेत. नुकतेच भारताने अग्नी 5 चे यशस्वी उड्डाण केले. दरम्यान अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून …

Read More »

लोकसभा लढवणार का? निलेश लंके म्हणतात, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा पण….

Nilesh Lanke: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातील नेते निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसले. यातच त्यांनी खासदरा अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याने चर्चा आणखी जोरात होऊ लागल्या. यावर निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी महानाट्यासंदर्भात अमोल कोल्हे यांची भेट घेतली. मी प्रवेश करणार …

Read More »

मुकेश अंबानींचे तिन्ही व्याही मोठे व्यावसायिक, कोण सर्वात जास्त श्रीमंत?

Mukesh Ambani: देशातील सर्वात वॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे छोटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलैमध्ये मुंबईत होईल. अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानींचे लग्नही थाटामाटात पार पाडले. ईशाचे सासरे अजम पिरामल देशाचे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. आकाशचे सासरे अरुण रसेल मेहता यांचा ज्वेलरीचा मोठा व्यवसाय आहे. तर अनंत अंबानींचे होणारे सासरे …

Read More »

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या …

Read More »

महाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंटमुळे 14 जण भाजले

Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यावेळी मोठी दुर्घटना घडून 14 जण भाजले. तर सर्व जखमींवर जवळच्या एमबीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्हाडी थर्मल येथे ही घटना घडली. कोटाच्या कुन्हाडी ठाणे क्षेत्रात महाशिवरात्र पर्व सुरु होतेय.यानिमित्ताने शिव बारात काढण्यात येत होती. पण अचानक करंट पसरला. यामध्ये 14 हून अधिकजण भाजल्याचे वृत्त आहे. लहान मुलांच्य हातामध्ये धार्मिक …

Read More »

ठरलं! भारतात ‘या’ तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल? जाणून घ्या

Flying Car: तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे चाललंय.  जगभरातील तांत्रिक प्रगतीचा वेग पाहता अशक्य असे काहीही वाटत नाही. भारतात मोनो, मेट्रो धावू लागल्या आहेत. पण वाढत्या लोकसंख्येसोबत वाहतुकीची यंत्रणाही अपग्रेड केली जाणार आहे. लवकरच फ्लाईंग कार/टॅक्सी भारतीयांच्या सेवेत दाखल होईल.  भारतातील पहिली फ्लाइंग टॅक्सी – E200 घडवताना आलेल्या अनुभवाबद्दल ePlane कंपनीचे संस्थापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासमधील एरोस्पेस इंजिनीअरिंग प्राध्यापक …

Read More »

तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? ‘अशी’ तपासा

EPF Balance: आजकाल सर्वच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफची सुविधा देतात. यामध्ये दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम आणि कंपनीकडील छोटा भाग ईपीएफमध्ये जमा केला जातो. ईपीएफवर सरकारकडून चांगले व्याज दिले जाते. कर्मचारी आपल्या निवृत्तीची तरतूद भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून करत असतात. सध्या ईपीएफच्या रक्कमेवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे. ईपीएफद्वारे भविष्यासाठी चांगली रक्कम जोडली जाऊ शकते. तुमच्यापैकी अनेकजण ईपीएफ …

Read More »

ISRO प्रमुखांना झालेला पोटाचा कॅन्सर कसा ओळखायचा? उपायही जाणून घ्या

Isro Chief S Somnath Stomach Cancer: इस्रो प्रमुख एस.सोमनाथ यांना पोटाचा कॅन्सर वृत्त समोर आले. जगभरातील अनेकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. एस.सोमनाथ यांनी एका खासगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पोटाच्या कॅन्सरबद्दल माहिती दिली. चांद्रयान 3 च्या लॉन्चिंगवेळीच आपली तब्येत बिघडली होती. पण सर्व टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. पण मी सप्टेंबरमध्ये स्कॅनिंग केले तेव्हा आलेल्या रिपोर्टमध्ये पोटात कॅन्सर वाढत असल्याचे कळाले, असे …

Read More »

महाशिवरात्री ते गुड फ्रायडे! मार्चमध्ये शाळांना किती दिवस सुट्टी आहे माहितीय का?

March School Holiday: महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल 2024 पासून सुरु होत असले तरी इतर बोर्डांचे वर्षे एप्रिल 2024 पासून सुरु होते. त्यामुळे मार्चमध्ये या विद्यार्थ्यांना आराम मिळतो. दरम्यान मार्चमध्ये हिंदु आणि ख्रिश्चन धर्मातील अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळे शाळांनादेखील सुट्टी आहे. 5 मार्च रोजी महर्षी दयानंद सरस्वती यांची जयंती आहे. तसेच 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. …

Read More »

EPFO अंतर्गत भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी ‘असा’ करा अर्ज

UPSC Epfo Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणाऱ्या ईपीएफओमध्ये पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  पर्सनल असिस्टंटच्या एकूण 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी …

Read More »

शिंदे गटाचा बडा नेता अजित पवारांच्या गाडीतून! राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Maharashtra Politics: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खूपच रंजक होणार आहे. कारण यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 2 गट एकमेकांविरोधात लढणार आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवताना त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे राज्याचे …

Read More »

‘तालुक्यात फिरु देणार नाही’ हर्षवर्धन पाटलांना मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच खुलेआम धमकी

Harsh Vardhan Patil is Threatened: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. इंदापूर तालुक्यात फिरु न देण्याची धमकी आल्याचा दावा पाटलांनी केलाय. इंदापूरमध्ये भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केलाय. सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय..ही बाब गंभीर असून यात तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंती हर्षवर्धन …

Read More »

सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी कितवी शिकल्यायत? करिअरबद्दल जाणून घ्या

Bansuri Sushma Swaraj: भाजपतच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री दिवगंत सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. बासुरी यांची आई सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यांचे वडिल स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयात सिनीअर अॅडव्होकेट आहेत. ते 6 वर्षे राज्यसभेद खासदार राहिले आहेत. याशिवाय मिझोरमचे राज्यपालही राहिले आहेत. स्वराज कौशल हे …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24च्या उन्हाळी सत्राच्या 299 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उन्हाळी सत्राच्या या परीक्षा मार्चपासून सुरुवात होत आहेत. या उन्हाळी सत्र  परीक्षेला 2 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेच्या तारखेसोबतच सत्र 6 च्या परीक्षेचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. यातील 2023-24 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र …

Read More »

ग्राहकांचे बजेट कोलमडणार! 24 तासात सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Gold Rate: सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या जळगावात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळे 1000  हजार रुपयांनी वाढ झाली आहे.  गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात चक्क एक हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.  बजेट कोलमडणार  ऐन लग्नसराई मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.आज सोन्याचे भाव जीएसटी सह 65 हजार 400 …

Read More »

घरात बसलेल्या महिला, तिच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाचा प्राणघातक हल्ला

Bhandara Crime: घरातील मंडळ बसलेली असतात आणि अचानक कोणीतरी घरात घुसतो आणि धारदार शस्त्राने हल्ला करु लागतो. हल्ला करणाऱ्याला ना स्वत:च्या जीवाची पर्वा, ना दुसऱ्याच्या, अन् ना कायद्याचा धाक… भंडारामध्ये दिवसाढवळ्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. काय घडलाय हा प्रकार? जाणून घेऊया.   तुमसर शहरातील दुर्गा नगरात घटना घडली. घरात एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीसोबत …

Read More »

निवडणूक प्रचारात पेनड्राइव्ह दाखवणार, ‘त्या’ भाजप नेत्याचं नावही सांगणार- अनिल देशमुख

Anil Deshmukh: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान देशमुख यांनी यावर महत्वाचे विधान केले आहे. परमबीर यांनी माझ्यावर 100 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून चौकशी करायला सांगितले होते.आरोप झाल्यानंतर निवृत्त न्यायाधीश कैलास चांदीवाल यांच्या समितीने चौकशी केली. दीड वर्षापूर्वी हा अहवाल सरकारकडे …

Read More »