EPFO अंतर्गत भरती, चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीसाठी ‘असा’ करा अर्ज

UPSC Epfo Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणाऱ्या ईपीएफओमध्ये पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

पर्सनल असिस्टंटच्या एकूण 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी नोंदणी प्रक्रिया 7 मार्चपासून सुरु होत आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

ईपीएफओ पर्सनल असिस्टंट असे या परीक्षेचे नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना पर्सनल असिस्टंट पदावर निवडले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्टेनो आणि टायपिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

3 टप्प्यांमध्ये परीक्षा

ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांची कागदपत्र तपासणी केली जाईल. तर अंतिम टप्प्यात वैद्यकीय चाचणी केली जाईल. 

हेही वाचा :  तयारीला लागा! राज्यात 100 टक्के पोलिस भरती होणार, सरकारचा मोठा निर्णय

कसा कराल अर्ज?

ईपीएफओ पर्सनल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsconline.nic.inवर जा. वेबसाइटवर दिलेल्या ‘ऑनलाइन अर्ज करा’ या लिंकवर क्लिक करा. ऑनलाइन अर्ज भरा. मागितलेले कागदपत्र अपलोड करा. अर्ज शुल्क भरा. त्यानंतर भविष्यातील उपयोगासाठी अर्ज भरल्याचा फॉर्म स्वत:कडे ठेवा.

अर्जाची शेवटची तारीख

27 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच अर्ज करावा. दिलेल्या मुदतीनंतर आणि ऑफलाइन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. अर्ज भरताना त्यात काही त्रुटी आढळणार नाहीत, याची काळजी घ्या. खरी माहिती भरा. तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. भरलेल्या माहितीमध्ये आणि सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही तफावत आढळल्यास तुमच्या हाती आलेल्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात असू द्या.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …