Tag Archives: बॉलिवूड

ती मी नव्हेच… मी जिवंत आहे, नावात झाला घोळ, अभिनेत्रीच्या हत्येच्या पसरल्या अफवा

Veena Kapoor: मुंबईमधील (Mumbai) एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी  जुहूमधील वीणा कपूर (Veena Kapoor) नावाच्या महिलेची हत्या झाली होती. त्या महिलेच्या मुलानं तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह हा नदीमध्ये फेकला. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. या महिलेचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेक ठिकाणी  व्हायरल झालेल्या माहितीमध्ये अभिनेत्री वीणा कपूर यांचा फोटो आणि …

Read More »

शाहरुख, दीपिकाच्या ‘पठाण’मधील बेशरम रंग गाण्यावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Besharam Rang Song: बॉलिवूडचा बादशाह ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि  शाहरुख यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर काही लोक या गाण्याला ट्रोल करत आहेत. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं  घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला. आता …

Read More »

साऊथ स्टार विजय सेतूपतीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

Vijay Sethupathi: दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपतीचा (Vijay Sethupathi) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. विजय हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटामध्ये विजय हा प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. विजयच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. विजय सध्या त्याच्या चित्रपटामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. विजयनं त्याचा …

Read More »

अमिताभ बच्चन यांनी सांगितल्या आठवणी; म्हणाले, ‘बँकेत एकही रुपया नव्हता, आर्थिक मदत करण्यासाठी ध

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एव्हर ग्रीन अभिनेत्यांपैकी एक आहेत. बिग बी हे त्यांच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ हे कोट्यवधींचे मालक आहेत. लग्झरी गाड्या, कोट्यवधींचे घर अशी अमिताभ बच्चन यांची संपत्ती आहे. पण सध्या कोट्यवधींचे मालक असणारे अमिताभ बच्चन हे एकेकाळी आर्थिक अडचणींचा सामना करत होते, हे अनेकांना माहिती नसेल. बिग …

Read More »

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) अडचणीत वाढ झाली आहे. शूटिंगदरम्यान राजपालने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  शूटिंगदरम्यान अपघात झाला आणि… शशांक श्रीवास्तवच्या आगामी सिनेमात राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहे. सध्या राजपाल कर्नलगंजमध्ये या सिनेमाचं शूटिंग करत आहे. एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याला स्कूटर चालवायची होती. पण स्कूटर चालवत असताना क्लच वायर …

Read More »

शाहरुख खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, ‘तोंड का लपवत आहे?’

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह अशी ओळख असणारा  प्रसिद्ध अभिनेता  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. शाहरुखच्या व्हायरल फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. शाहरुखच्या पठाण (Pathaan) चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट रिलीज होण्याआधी शाहरुखनं वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या (Vaishno Devi) मंदिराच्या आवारातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला …

Read More »

Athiya Shetty KL Rahul Wedding : लगीनघाईला सुरुवात! केएल राहुल, अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात

Athiya Shetty KL Rahul Wedding Date : सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांची लाडकी लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलच्या (KL Rahul) लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.  21 ते 23 …

Read More »

Smita Patil: तिच्याविना आजही मैफिल सुनी सुनी… स्मिताचं गारुड आजही कायम का?

मुंबई: काही लोक आपल्या व्यक्तीमत्वाची अशी छाप सोडून जातात की त्यांना विसरावं म्हटलं तरी विसरणं शक्य नसतं. स्मिता पाटील हे नाव त्यापैकीच एक. अभिनयाची अनभिषक्त सम्राज्ञी, कोट्यवधी मनांवर अधिराज्य करणारी स्मिता पाटीलचं आजच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 1986 रोजी निधन झालं. वयाच्या केवळ 31 व्या वर्षी स्मिताला आजारपणामुळे हे जग सोडावं लागलं आणि अवघी सिनेसृष्टी हळहळली. स्मिताविना आजही मैफिल सुनी …

Read More »

Golden Globes 2023: RRR चित्रपटाचा जगात डंका, मानाच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन जाहीर

मुंबई: केवळ भारतातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातलेल्या एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. आरआरआर चित्रपटाचं मानाच्या गोल्डन ग्लोब (Golden Globes2023 Nomination ) पुरस्कारासाठी नामांकन झालं आहे. बेस्ट फॉरेन फिल्म आणि बेस्ट ओरिजनल साँग या दोन प्रकारात आरआरआर चित्रपटाचे नामांकन झालं आहे. हे नामांकन नॉन इंग्लिश चित्रपटाच्या प्रकारात झालं असून आरआरआर या …

Read More »

रणवीरचं न्यूड फोटोशूट ते कॉमेडियन वीर दासची कविता; 2022 मधील ‘बॉलिवूड कॉन्ट्रोव्हर्सी’

Year Ender 2022: 2022 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक सज्ज झाले आहेत. 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खास वर्ष होते. या वर्षी अनेक चित्रपट हिट ठरले तर काही कलाकारांचा गौरव देखील करण्यात आला.  आरआरआर, ब्रह्मास्त्र, गंगूबाई काठियावाडी यांसारख्या बिग बजेट चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली पण अवघ्या 16 कोटींमध्ये तयार झालेला कांतारा भाव खाऊन गेला. …

Read More »

शाहरुख खान वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; मंदिराच्या आवारातील व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून शाहरुख हा चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधी शाहरुखनं वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या मंदिराच्या आवारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा त्याच्या बॉडिगार्ड्ससोबत …

Read More »

…म्हणून Sushant Singh Rajput चा फ्लॅट आजही आहे रिकामा

Sushant Singh Rajput Flat : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुशांतचं निधन झालं तेव्हा तो वांद्रे येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर आता अडीच वर्षानंतरही फ्लॅटच्या मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  सुशांत राहत असलेला फ्लॅट आता त्या फ्लॅटच्या मालकाला कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्याने द्यायचा नाही. ब्रोकरने …

Read More »

शाहिदच्या पत्नीनं ईशान खट्टरच्या लगावली कानशिलात

Shahid Kapoor :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याचा भाऊ अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter)  हे सोशल मीडियावर त्यांचे मजेशीर व्हिडीओ नेहमी शेअर करतात. सोशल मीडियावर दोघांमधील बॉन्डिंग पाहायला मिळते.  शाहिदची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) , शाहिद आणि ईशान यांनी एक मजेशीर व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी फरहान अख्तरच्या दिल चाहता है या …

Read More »

Happy Birthday Rajinikanth : बस कंडक्टर ते सुपरस्टार ‘रजनीकांत’; जाणून घ्या ‘थलायवा’चा फिल्मी प

Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज जन्मदिन आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ‘थलायवा’ (Thalaiva) रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे.  बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत कसा झाला?  घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रजनीकांत यांनी कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केले. त्यावेळी त्यांना महिन्याला 750 रुपये मिळायचे. …

Read More »

ट्विंकल खन्नाचा लंडनच्या स्विमिंग पुलावरील हॉट व्हिडीओ, चाहते म्हणाले… परफेक्ट फिगर

लंडन: अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती नेहमीच तिचे आणि तिच्या कुटुंबीयांचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही लंडनमधील एका स्विमिंग पुलावरचा असाच एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर (Twinkle Khanna Instagram Viral Video) शेअर केला आहे. यामध्ये ती हॉट लूकमध्ये दिसून येते, तसेच ट्विंकलची परफेक्ट फिगर यामध्ये दिसते. ट्विंकलच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान …

Read More »

Year Ender 2022 : बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमांनी जमवला 100 कोटींचा गल्ला

Year Ender 2022 : 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood) खास ठरलं आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले. तगडी स्टारकास्ट असूनही हे सिनेमे बॉक्सऑफिसवर सपशेल अपयशी ठरले. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. जाणून घ्या 2022 मध्ये कोणते सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले… ब्रह्मास्त्र (Brahmastra) :  रणबीर कपूर (Ranbir …

Read More »

Sai Pallavi बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज!

Sai Pallavi Bollywood Debut : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) दाक्षिणात्य सिनेमांचा (South Movies) दबदबा आहे. अनेक दाक्षिणात्य सिनेमे आणि वेबसीरिज हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहेत. कोरोनानंतर सिनेरसिक जागतिक पातळीवरचे सिनेमे पाहू लागले आहेत. हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत असताना आता दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) बॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे.  दाक्षिणात्य सिने-निर्माता अल्लू अरविंदचा ‘रामायण’ (Ramayana) …

Read More »

थरकाप उडवणारा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार; Amrish Puri यांचं आयुष्य रुपेरी पडद्यावर!

Amrish Puri Biopic : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बायोपिकचा (Biopic) ट्रेंड आहे. अशातच आता ‘मोगॅम्बो’  उर्फ दिवंगत अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा बायोपिक येणार असल्याचं समोर आलं आहे. रुपेरी पडद्यावरचा खलनायक खऱ्या आयुष्यात कसा होता हे प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.  सर्वांच्या आवडीचा खलनायक! खलनायक सहसा आवडीचा होत नाही. पण अमरीश पुरी मात्र याला अपवाद आहेत. खलनायक म्हणून …

Read More »

अक्षय कुमारनं दिली नव्या ब्रँडची माहिती

Akshay Kumar:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) आता त्याच्या नव्या फॅशन ब्रँडची घोषणा केली आहे. या ब्रँडचं नाव फोर्सनाइन असं आहे. अक्षयनं नुकताच एक खास व्हिडीओ शेअर करुन त्याच्या या नव्या ब्रँडची माहिती चाहत्यांना दिली. या व्हिडीओमध्ये अक्षयचं आलिशान घर देखील दिसत आहे. अक्षयनं व्हिडीओमध्ये त्याच्या घरातील वॉर्डरोब देखील आहे.  अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, ‘फोर्सनाइन …

Read More »

Sharmila Tagore : सिनेमात काम करण्यासाठी शर्मिला टागोरांनी सोडलं शिक्षण

Sharmila Tagore : 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची गणना बॉलिवूडमधील लिजेंड अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. सिनेमांपेक्षा शर्मिला त्यांच्या लूक आणि अदांमुळे नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. आज शर्मिला टागोर त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत.  वयाच्या 13 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण शर्मिला टागोर शाळेतून घरी परतत असताना सत्यजित रे यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या घरापर्यंत …

Read More »