वडिलांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या स्वाती मलिवाल ट्रोल, 2019 मधील जुनी पोस्ट व्हायरल

Father Sexually Abused Me Vs Proud Daughter: दिल्ली महिला आयागोच्या (Delhi Woman Commission) प्रमुख स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी शनिवारी एक धक्कादायक खुलासा केला. लहान असताना वडिलांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असं स्वाती मलिवाल यांनी सांगितलं आणि एकच खळबळ उडाली. मात्र स्वाती मलिवाल यांच्या या विधानानंतर त्यांना ट्रोल केलं जात आहे. याचं कारण म्हणजे स्वाती मलिवाल यांनी याआधी आपल्या वडिलांबद्दल केलेल्या विधानांमधून सत्य वेगळं असल्याचा संबोधित होत आहे. 

स्वाती मलिवाल यांनी आपल्या वडिलांबद्दल खुलासा केल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. पण त्यांच्या विधानानंतर 24 तासातच काहीजणांनी त्यांच्या 2019 मधील पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला वडिलांचा अभिमान असल्याचं म्हटलं होतं. आता ज्या वडिलांचा अभिमान वाटत होता, अचानक ते कसे बदलले अशी विचारणा युजर्स करत आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यानेही हाच पिता समाजात तुला काम करण्यासाठी प्रेरणा देत होता याची आठवण करुन दिली आहे. 

जुन्या ट्वीटमध्ये नेमकं काय?

स्वाती मलिवाल यांनी 26 फेब्रुवारी 2019 रोजी एक ट्वीट केलं होतं. भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवरील दहशतवादी ठिकाणं बॉम्बच्या सहाय्याने नष्ट केल्याच्या ट्विटवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. रिट्वीट करताना त्यांनी लिहिलं होतं की “ही फारच चांगली बातमी आहे. भारतीय हवाई दलाच्या धैर्य आणि क्षमतेला समान. एका हवाई दल अधिकाऱ्याची मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. जय हिंद”.

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजीव राय यांनी ट्विटरला स्वाती मलिवाल यांना टॅग करत तीन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. नेमकं सत्य काय आहे अशी विचारणा त्यांनी यावेळी केली आहे. 

अनेक युजर्सनीही स्वाती मलिवाल यांना सुनावलं असून, प्रकाशझोतात राहण्यासाठी आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही किती खालच्या स्तराला जाता. तुमची आणि तुम्हाला इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलण्यास शिकवणाऱ्यांची लाज वाटते असं त्याने म्हटलं आहे. 

हेही वाचा :  जगातील टॉप १० श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय; गौतम अदानींच्या संपत्तीमधील वाढ पाहून थक्क व्हाल | mukesh ambani only indian billionaire in top 10 rich hurun list gautam adani net worth sgy 87



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …