Viral Video: कार भरधाव वेगात असताना स्टेअरिंग सोडून चालकाचे पत्नीसोबत चाळे, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Viral Video: सोशल मीडियाच्या (Social Media) या जमान्यात आपलाही एखादा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी मग इतरांपेक्षा काहीतरी हटके करण्याचे प्रयत्न सुरु होतात. पण अनेकदा या प्रयत्नांमध्ये आपला जीव धोक्यात घातला जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. कारण या व्हिडीओत रिल (Reel) बनवण्यासाठी चालकाने हातातलं स्टेअरिंग सोडून दिलेलं आहे आणि पत्नीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. या व्हिडीओवरुन अनेकांनी खडे बोल सुनावले आहेत. राजस्थानामधील (Rajasthan) सवाई माधोपूर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे. 

व्हिडीओत नेमकं काय आहे?

व्हिडीओत चालक Mahindra XUV700 चालवताना दिसत आहे.  यावेळी त्याने गाडी अॅडव्हान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टम (ADAS) मोडवर टाकलेली आहे. दुर्घटना कमी करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचा चालक मात्र गैरवापर करत असल्याचं दिसत आहे. कारण गाडी ADAS मोडवर टाकल्यानंतर चालक निवांत बसलेला दिसत असून आपल्या पत्नीसह चाळे करत आहे. 

कधी तो पत्नीशी चाळे करत आहे, तर कधी आपले दोन्ही पाय तिच्या सीटवर टाकून बसत आहे. हे सर्व करताना त्याचं रस्त्यावर अजिबात लक्ष नसतं. मागील सीटवर बसलेली ही व्यक्ती मोबाइलवर हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. व्हिडीओ रेकॉर्ड होत असताना मागे सलमान खानच्या दबंग चित्रपटातील ‘सुरीली आंखियो वाले’ गाणं वाजत असल्याचं ऐकू येत आहे. 

इन्स्टाग्रामवर अफसर घुड़ासी (afsar_ghudasi44) या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. ट्विटरला एका युजरने ही रील शेअर करत संताप व्यक्त केला आहे. “ऑटोमोबाइलशी संबंधित इतका विचित्र आणि मूर्ख प्रकार तुम्ही याआधी पाहिला नसेल. फक्त रील बनवण्यासाठी. अशा लोकांसोबत आपल्या रस्ता शेअर करावा लागतो हे किती हास्यास्पद आहे. हा मूर्खपणा आहे,” असं त्याने म्हटलं आहे. 

हेही वाचा :  मित्राला ठार करुन शेतात गाडलं, नंतर कुटुंबाकडे मागितले 6 कोटी; पोलिसांनी तिघांना गोळ्या घालून...

दरम्यान एका युजरने आपल्याकडे पुढारलेल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असून मस्करी सुरु आहे असा संताप व्यक्त केला आहे. तर एका युजरने चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

ADAS फिचर नेमकं कसं काम करतं?

ADAS (Advanced Driver Assistance System) फिचरचा मुख्य उद्दिष्ट अपघात कमी करणं आहे. हे रडारवर आधारित तंत्रज्ञान आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवत हे फिचर स्वत: कारला नियंत्रित करतं, ज्यामुळे अपघात टाळला जाऊ शकतो. Mahindra XUV700 मध्ये हे फिचर उपलब्ध आहे. भारतामध्ये हे फिचर कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून …

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …