प्रियांका अन् दीपिकानंतर आता आलियाची हॉलिवूड वारी; ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

Alia Bhatt : बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमधील (Hollywood) चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) तसेच अभिनेत्री दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) हॉलिवूडमध्ये काम करून परदेशातील प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच आलिया भट (Alia Bhatt) देखील हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया ही हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री गल गडोट (Gal Gadot) सोबत स्पाय थ्रिलर चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart of Stone) मध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक टॉम हार्पर हे करणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. 

गल गडोट आणि आलियासोबत या चित्रपटात जेमी डॉरनन हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. अभिनेत्री गल गडोटनं काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 


आलियाचा सध्या गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. तसेच आलियाचे आरआरआर आणि ब्रम्हास्त्र हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटामध्ये देखील आलिया महत्वाची भूमिका साकारणार आहे. 

हेही वाचा :  इंफाळमधील फॅशन शोच्या ठिकाणाजवळ स्फोट, सनी लिओनी लावणार होती हजेरी

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …