सावधान! महिलांना छम्मक छल्लो, आयटम म्हणाल तर… इतक्या वर्षांची होऊ शकते शिक्षा

NCIB Report : भारतीय संस्कृतीत स्त्रीला माता, देवीचा दर्जा देण्यात आला आहे. महिलांचा (Woman) आदर करणं, त्यांचा सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. पण आजही समाजात अशी काही लोकं आहेत, जे स्त्रीचा सातत्याने अपमान करत असतात.  स्त्री नोकरदार असो किंवा गृहिणी, तरुण असो वा लहान बालिका, ती कुठेच सुरक्षित नाही. स्त्रीवर अभद्र आणि अश्लील कमेंट (Obscene Words) करणं हे काही जणं प्रतिष्ठेचं मानतात. महिलांची छेड काढणं, त्यांना पाहून अश्लिल हावभाव करणं हे तर काहीजणं आपला जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं वागतात. 

काही वेळा महिला हिम्मत करुन तक्रार करतात, पण अनेक प्रकरणात आपली बदनामी होईल या भीताने महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. तक्रार आलेल्या प्रकरणात पोलीस कारवाई करुन आरोपींना अटक करतात, काही वेळा त्यांना चांगला चोपही दिला जातो, पण निगरट्ट असलेले हे आरोपी सुधारण्याचं काही नाव घेत नाहीत. पण आता अशा लोकांना आयपीसी अंदर्गत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

NCIB ची सोशल मीडियावर पोस्ट
नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने (National Crime Investigation Bureau) सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर केली आहे. यात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीने महिलांविषयी आवारा, छम्मक-छल्लो, आयटम, चुडेल, कलमुखी किंवा चरित्रहीन अशा शब्दांचा वार केला, किंवा अश्लिल हावभाव केले, ज्यामुळे महिला अपमानित होतील असं कृत्य केलं तर त्यावर आयपीसी कलम 509 अंतर्गत 3 वर्षांचा तुरुंग वास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रित होऊ शकते. 

हेही वाचा :  राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा

पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
16 डिसेंबरला करण्यात आलेल्या या ट्विटला आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. अनेक युजर्सने यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही युजर्सनेम म्हटलंय, महिलांचा अपमान करणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा तशी फारच कमी आहे. यात आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूद व्हायला हवी. एका युजरने म्हटलंय, काही जणं महिलांविषयी हे शब्द अगदी सहजपणए बोलतात. अशा लोकांना यापेक्षा कठोर कारवाई व्हायला हवी.

पुरुषांना अपमानित करणारे शब्द वापरले तर?
दरम्यान, एनसीआईबीच्या या ट्विटव काही लोकांनी प्रतिप्रश्नही उपस्थित केले आहेत. पुरुषांनी महिलांना अपमानित करणारे शब्द वापरले तर त्यांना शिक्षेची तरतूद आहे. पण महिलांना पुरुषांविषयी अपशब्द जसं की कुत्रा, नीच, बेवडा, छपरी असे शब्द वापरल तर कोणत्या शिक्षेची तरतूद आहे? यावर काही युजर्सने म्हटलंय जंस पुरुषांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, तसं महिलांनाही 3 वर्षांची शिक्षा व्हायला हवी.

हे ही वाचा : Research : बाटलीबंद पाणी प्यायल्याने पुरुषांना नपुंसकत्वाचा धोका? धक्कादायक खुलासा

महाराष्ट्रात महिलांवरीत अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
कितीही कठोर शिक्षा झाली तरी आजही महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये घट झालेली नाही. दिवसा-ढवळ्या विनयभंग, एकतर्फी प्रेमातन हत्या किंवा सामूहिक बलात्काराच्या घटन घडतच असतात. महाराष्ट्रही अशा घटनांमध्ये मागे नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) अलीकडेच जाहीर केलेल्या अहवालामुळं महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. NCRBच्या अहवालानुसार, 2021 मध्ये 2020 पेक्षा अत्याचाराच्या घटनांमध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्र महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या संख्येतील ही वाढ अस्वस्थ करणारी आहे. 

हेही वाचा :  Budget 2024च्या आधीच सरकारला मिळाली गुड न्यूज; जीएसटीबाबत दिलासादायक माहिती समोर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …